किशन जावळे यांनी दाखविला हिरवा झेंडा

 

 

रायगड : अलिबाग
जिल्हा प्रशासनच्यावतीने जिल्ह्यात उद्भवणाऱ्या विविध आपत्ती संदर्भात जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथून मॅरेथॉन जनजागृती स्पर्धा रॅलीला जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तहसीलदार विक्रम पाटील उपस्थित होते.
या मॅरेथॉन जनजागृती स्पर्धा रॅलीचा मार्ग कन्या शाळा, राम मंदिर, महावीर चौक, बालाजी मंदिर, हनुमान मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा होता. मॅरेथॉन मध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते बक्षिस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठा सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *