ठाणे : शारदा एज्युकेशन सोसायटी संस्थेचा वर्धापन दिन व भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन शारदा एज्युकेशन सोसायटीचे आनंद विश्व गुरुकुल येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व राष्ट्रगीत गायनाने झाली. त्यानंतर एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना देत एनसीसी व एनएसएस या विद्यार्थ्यांनी गीत गायले. तसेच एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. संस्थेच्या सदस्या व आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षदा लिखिते यांनी या दिनाचे महत्त्व वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे सांगितले. संस्थेचे सचिव प्रा. डॉ. प्रदिप ढवळ सर यांनी विद्यार्थ्यांना उत्तम नागरिक होण्यासाठी आपल्या भाषणातून स्फुरण दिले. स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेचे विद्यार्थी व महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी आपले देशप्रेमव्यक्त भाषण सादर केले.
कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. मिलिंद जोशी यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांमधील देशभक्ती जागृत करत विद्यार्थ्यांना सुजाण नागरिकाचे कर्तव्य पार पाडण्यास सांगितले. कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे अध्यक्ष विलास ठुसे यांनी देखील आपले मनोगत मांडत विद्यार्थ्यांना चांगले व सुजाण नागरिक होण्याची प्रेरणा दिली. यावेळी संस्थेच्या सदस्या डॉ. नमिता बिवलकर, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा हर्डीकर, डॉ. प्रांजली ढवळ उपस्थित होत्या.
15 ऑगस्ट हा दिवस शारदा एज्युकेशन संस्थेचा वर्धापन दिन देखील असल्यामुळे संस्थेचा १६ वा वर्धापन दिन हा गुरुकुलच्या आवारात सत्यनारायण पूजेच्या सोहळ्याने साजरा करण्यात आला. या सोहळ्याला संस्थेचे सर्व पदाधिकारी, गुरुकुलचे सर्व विभागाचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0000
