स्वातंत्र्यदिनाप्रित्यर्थ शेकडो वयोवृद्धांना रोटरीकडून अन्नधान्य वाटप
ठाणे : ‘जे का रंजले, गांजले त्यासी म्हणे आपुले’ …या उक्तीनुसार बेघर तसेच सोडून दिलेल्या वयोवृद्धांचा संभाळ करणाऱ्या काल्हेर येथील ‘स्मित ओल्ड एज अँड होम केअर फॉउंडेशन’ला रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थने मोफत अन्नधान्य वाटप केले. स्वातंत्रदिनाचे औचित्य साधुन रोटरी क्लबने आपल्या अन्नदान प्रकल्प अंतर्गत हा उपक्रम नुकताच राबवला.
काल्हेर येथील ‘स्मित ओल्ड एज अँड होम केअर फॉउंडेशन’ मार्फत रस्त्यांवर तसेच रेल्वे स्थानकांवर सोडून दिलेल्या वयोवृद्धांना आसरा दिला जातो. या संस्थेच्या वृद्धाश्रमात १२६ स्त्री – पुरुष वयोवृद्ध नागरीक असुन त्यांचे संगोपन आणि पालनपोषण स्मित ओल्ड एज ॲड होम केअरच्या संस्थापक योजना भोईर पदरमोड करून करतात. वयोवृद्धांची ही निकड ओळखुन रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थने ७७ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्टला काल्हेर येथील वृद्धाश्रमात मोफत धान्य वाटप केले. या धान्याचा तेथील १२६ वयोवृद्ध स्त्री पुरुषांना लाभ होणार आहे. याप्रसंगी रोटरी क्लबच्या अध्यक्षा मेधा जोशी,सचिव अमोल नाले, अन्नदात्या ममता धर्मु वंजानी आदी उपस्थित होते.
0000
