नाशिक : सकल हिंदू समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान दुकाने बंद करण्यावरून दोन गटांत वाद झाला होता. यानंतर वादाचे रुपांतर दगडफेकीत झाले. यामुळे नाशिकमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता या प्रकरणी नाशिक पोलीसांनी आतापर्यंत ३०० दंगलखोरांवर गुन्हे दाखल केले असून अनेकांची धरपकड सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली आहे.
बांग्लादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ एका समूहाने शुक्रवारी पुकारलेल्या नाशिक बंदला अचानक हिंसक वळण लागले. दोन वेगवेगळे गट आमनेसामने आले व त्यांनी दगड, विटा, काचेच्या बाटल्या एकमेकांवर फेकल्या. पोलिसांनी वेळीच धाव घेत, परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच संशयितांची धरपकड करायला सुरुवात केली.
