पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचं करण्यात आलं होतं. मात्र, त्यांच्या यात्रेला विरोध करत मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. ‘नितेश राणए गो बॅक’, ‘एक मराठा, लाख मराठा’, अशी घोषणाबाजी करत राणेंच्या यात्रेला विरोध केल्याचं दिसून आलं. यावेळी, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या इंदापूरमधील गढीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये आमदार नितेश राणे, ह.भ.प.संग्राम बापू भंडारे पाटील, सागर भैया बेग यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आलाय. मात्र, या मोर्चादरम्यान काही मराठा आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नावाने घोषणाबाजी करत यात्रेला विरोध केला.
