मुरबाड : मुरबाड नगर पंचायतीचे नगराध्यक्ष मुकेश विशे यांच्यातर्फे स्वातंत्र्यदिनी १३० महिलांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुरबाडचे आमदार किसन कथोरे उपस्थित होते. मुरबाड शहरातील तिरंगा चौक, तीन हात नाका येथे हा कार्यक्रम पार पडला. मुरबाड येथील शिवाजी चौकापर्यंत महिलांची बाईक रॅली काढण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी भाजप नेते नितीन मोहपे,  सुरेश बांगर, अनिल घरत, सचिन चौधरी, मुरबाड नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष मानसी देसले, मोहन सासे, अर्चना विशे, दीक्षित वारे, मोहन गडगे, जगन्नाथ माळी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *