खर्डी : वासिंद परिसरातील दहागाव येथे रक्षाबंधनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर झाडांना राखी बांधण्यात आली. डोंबिवली येथील रोटरी क्लब, रोटरी क्लब फॉर डेफ स्कूल व पर्यावरणवादी सामाजिक संस्था शहापूरच्या संयुक्त विद्यमाने रोटरी क्लब स्कूलचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. तसेच, राखी बांधून पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाचा अनोखा उपक्रम हाती घेतला. यावेळी पर्यावरणवादी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र गोतरणे, रोटरी क्लब डोंबिवली अध्यक्ष समीर कुलकर्णी, रोटरी क्लब फॉर डेफच्या मुख्याध्यापिका अपेक्षा ठाकूर, आयोजक शुभांगी गायकर, योगिता तलवारे, स्वरा सप्रे, भाऊसाहेब राठोड, अमोल ठेंगे, योगीराज महाले, अनिल सरदार, सुरेश जाधव, जगतराव खोद्रे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *