अशोक गायकवाड
कर्जत : कर्जत तालुक्यातील चार गावांच्या सनदा नव्याने भारतीय सर्वेक्षण विभागाकडून प्राप्त झाल्या असुन चार गावांच्या सनद वाटपाचा कार्यक्रम १५ ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न झाला, मौजे मानकिवली ता. कर्जत १००% सनद फी वसूल झाली. अशी माहिती उप अधीक्षक भूमि अभिलेख नितीन आटाळे यांनी दिली आहे.
सनदांची प्रिंट करून सनदा वाटप विषयाची माहिती कार्यालयाच्या ग्रुपवर त्याच दिवशी पाठविण्याची होती व सनद फी वसुल केलेली रक्कम मुख्यालय सहाय्यक यांच्याकडे जमा करायची होती. या कामास टाळाटाळ होता कामा नये. टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतां विरुध्द नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल अशी सूचना देण्यात आली होती. संबंधीत गावचे ग्रामसेवक यांनी आपण सनद वाटप करण्यासाठी येणार असल्याची माहिती गावकऱ्यांना दिली होती. त्या अनुषंगाने बोरगाव येथे १५ ऑगस्ट २०२४ रोजी संजय गायकवाड भूकरमापक व निलेश जाधवर प्रतिलिपीक, माणकिवली येथे अण्णासाहेब सोमवंशी भूकरमापक व अभिजित मुजमुले अभिलेखापाल, कळंबोली तर्फे वरेडी येथे रामचंद्र कवटे निमतानदार व कृष्णा गायकवाड भूकरमापक, नसरापुर येथे कृष्णा गायकवाड भूकरमापक व सचिन थोरात भूकरमापक हे अधिकारी- कर्मचारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते, असे उप अधीक्षक भूमि अभिलेख, शिरस्तेदार शैलेश जाधव यांनी कळविले आहे.
