नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रा मध्ये हिवताप / डेंगी, जलजन्यथ व साथरोग आजारांबाबत जनजागृती होणे करीता जाहिर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. सदर शिबिरांकरीता नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
त्याअनुषंगाने कार्यक्षेत्रात जास्तीच जास्त नागरीकांपर्यंत पोहोचुन जनजागृती करणेकरीता दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी खालील प्रमाणे विशेष जाहीर शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
1. सी बी डी, पंचशील झोपडपट्टी, (1) अंगणवाडी (बेलापूर स्मशान भूमी जवळ)
2. करावे, गावदेवी मंदिर, से.२३,दारावेगाव.
3. से-48, लिलाताई पाटील बिल्डिंग, प्लॉट नं १०८, गाळा क्र.१ ते ३, से.२७, सीवूड.
4. नेरुळ 1, मोरेश्वर बांधकाम, सेक्टर १९अ ,नेरूळ.
5. नेरूळ 2, न.मुं.म.पा. शाळा क्र.१०,नेरूळगांव.
6. कुकशेत, दर्शन दरबार जवळ, सेक्टर ६,सारसोळेगाव.
7. शिरवणे, पाटील समाजमंदिर, शिरवणेगाव गावठाण.
8. सानपाडा, गावदेवी मंदिर, सानपाडा गांव.
9. तुर्भे,सरमाई मंदिर, शिवशक्ती नगर, तुर्भे स्टोर, ठाणे बेलापूर रोड.
10. पावणा, साईबाबा मंदीर, कोपरी गाव.
11. इंदिरानगर, हनुमान नगर, हनुमान मंदिर.
12. जुहुगाव, ॐ भैरवनाथ रो हाऊस, सेक्टर-10 वाशी.
13. वाशीगाव, श्री गणेश मंदीर, SS-II टाईप, सेक्टर – २, वाशी.
14. खैरणे, सेक्टर 5, गणपती मंदिर, स्वामी विवेकानंद शाळा च्या बाजूला कोपरखैरणे.
15. महापे, से 1,2,3,4 मैदान सांस्कृतिक सभा मंडप कोपरखैरणे
16. घणसोली, कौलअळी, भवानी माता मंदीर,, घणसोली गांव.
17. राबाडा, ईच्छा पूर्ती गणपती मंदिर, सेक्टर – 15 ऐरोली.
18. कातकरीपाडा, साईबाबानगर, डॉ. पांडे क्लिनिक.
19. ऐरोली, तुळशी काशी चाळ, ऐरोली गाव.
20. चिंचपाडा, शिवप्रेरणा चाळ मंदिर जवळील सभामंडप, गणेशनगर.
21. दिघा, बिंदू माधव नगर, दिघा, समाज मंदिर जवळ.
22. इलठणपाडा, चावडी समोर,दुर्गा मंदिरा जवळ, कन्हैयानगर.
23. नेासीलनाका, डॉक्टर गोराडे दवाखाना बंधन बँक जवळ. अर्जुन वाडी.
24. घणसोली से-4, सेक्टर १ चौक घणसोली.
उपरोक्त तक्त्यामध्ये नमुद ठिकाणी सर्व तापाच्या रुग्णांचे रक्तनमुने घेण्यात येणार आहेत तसेच हिवताप / डेंग्यु, जलजन्य व साथरोग या आजारांबाबत माहिती देण्यात येणार आहे. शिबिरांची वेळ सकाळी 10:00 ते दुपारी 2:00 वाजे पर्यंत आहे.
हिवताप / डेंग्यु, जलजन्य व साथरोग आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरीकांच्या प्रत्यक्ष सहभागाची आवश्यकता असुन, नमुंमपा कार्यक्षेत्रातील नागरीकांनी शिबिरांचा लाभ घ्यावा व ताप असल्यास रक्ताची तपासणी करुन घ्यावी तसेच हिवताप / डेंग्यु, जलजन्य व साथरोग आजाराबाबत माहिती घ्यावी असे आवाहन मा. आयुक्त, डॉ. कैलास शिंदे, यांनी केले आहे.
