ठाणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कल्याण शाखा आणि समविचारी संघटना एकत्र येऊन “डॉ.नरेंद्र दाभोळकर” यांना सकाळी 7 वाजता कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन येथे अभिवादन करण्यात आले. त्यांचा स्मृतिदिन 20 ऑगस्ट हा राष्ट्रीय वैज्ञानिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
यावेळी समता संघर्ष समितीचे शैलेश दोंदे, सुरेखा पैठणे,सोशल एज्यूकेशन मुव्हमेंटचे ऍड अरुण कांबळे, सुरेश भोसले, अभिजित गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र चंदने , जेष्ठ साहित्यीक किरण येले, सिने नाट्य अभिनेते सुधाकर वसईकर, सुधीर चित्ते, सामाजिक कार्यकर्ते संजय इधे , कल्याण पूर्व मधून मॉर्निंग वॉक कट्ट्याचे संजय निरभवणे ,सुनील पगारे, नवीन कांबळे, देवानंद नीलकंठ, सौ. राधिका शिवणकर उपस्थित होते.
देशात आणि राज्यात महिलावर अत्याचार होत आहेत. अलीकडेच कोलकाता येथे डॉक्टर तरुणीचा गॅंग रेप करून खून झाला. बदलापूर येथे शाळेतील चिमुरडयांवर अत्याचार करण्यात आले आहे, महाराष्ट्र अशा अनेक घटना घडल्या आहेत. महिला वरील अन्याय अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सर्वांनी पुढे येऊन, आरोपींना कठोर शासन झालेच पाहिजे अशी मागणी करण्यात आली.याचाही सामूहिक निषेध करण्यात आला.गोळी घालून विचार संपवता येत नाहीत. अत्यंत कठीण परिस्थितीतही डॉ दाभोलकर यांचा विवेक विचार पुढे घेऊन जाण्याचा निर्धार सर्वांनी केला. एकत्र लढूया असे आवाहन ही अंनिसच्या माध्यामातून करण्यात आले.
अभिवादन सभेचे आयोजन व नियोजन कल्याण शाखा कार्यध्यक्ष सुषमा बसवंत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजेश देवरुखकर, यांनी केले.
