माथेरान : क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन विविध सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असून रक्षाबंधनचे औचित्य साधन दरवर्षीप्रमाणे पनवेल मधील विजय सेल जवळील सिग्नलच्या चौकात वाहतूक नियम मोडणाऱ्यांना राखी बांधत सुरक्षेची काळजी घ्या,वाहतूक नियम पाळा संदेश देत १९,ऑगस्ट रक्षाबंधन साजरे करण्यात आले
घाई व टाळाटाळ या अनुषंगाने अनेक हेल्मेट घालणे, शीट बेल्ट न लावणे, सिग्नल तोडणे असे विविध नियम तोडून अपघात घडत असतात वेळप्रसंगी मृत्यूही घडतात
दरवर्षी वाहतूक विभागामार्फत सुरक्षा सप्ताह च्या माध्यमातून जनजागृती केली जाते
नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन रक्षाबंधन मध्ये भाऊ बहिणीचे जसं एकमेकाची काळजी सुरक्षा म्हणजे रक्षाबंधन असत त्याच धर्तीवर वाहतुकीचे नियम मोडू नका,मृत्यूला सामोरे जाऊ नका हा संदेश देत घरी आपले परिवारातील सदस्य वाट पाहत असतात यापुढे वाहतुकीचे नियम पाळा असे मार्गदर्शन करत वाहतूक नियम मोडणाऱ्यांना राखी बांधत स्वतःचे व परिवाराची काळजी घेण्याचा मार्गदर्शन करण्यात आले.
रक्षाबंधन पासून वंचित राहणारे कर्तव्यावर असणारे पोलीस,कर्मचारी,अधिकारी यांनाही क्रांतीज्योत महिला फाउंडेशनच्या वतीने रक्षाबंधन शुभेच्छा देत राखी बांधत सर्वांना रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचा आनंद देण्यात आला. क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थांनी विविध सामाजिक कार्यातून जनतेचे प्रबोधन करत वेगवेगळे उपक्रम राबवावेत क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा रूपालीताई शिंदे यांनी विचार मांडत पुढेही आमचे जनप्रबोधन व सामाजिक कार्य चालू राहील असे मत व्यक्त केले.
तसेच वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी रक्षाबंधन उपक्रमाचा आनंद व्यक्त करत क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन ला शुभेच्छा देत जनतेने वाहतुकीचे नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन केले हेल्मेटचा वापर टाळतात,सीट बेल्ट लावत नाहीत,सिग्नल तोडणे असे विविध वाहतुकीचे नियम तोडले जातात दरवर्षी वाहतूक विभागामार्फत ही सुरक्षा सप्ताहच्या माध्यमातून जनजागृती केली जाते,त्याच धर्तीवर क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन रक्षाबंधन मध्ये भाऊ बहिणीचे जसं एकमेकाची काळजी सुरक्षा म्हणजे रक्षाबंधन असत त्याच धर्तीवर वाहतुकीचे नियम मोडू नका,मृत्यूला सामोरे जाऊ नका हा संदेश देत घरी आपले परिवारातील सदस्य वाट पाहत असतात यापुढे वाहतुकीचे नियम पाळा असे मार्गदर्शन करत वाहतूक नियम मोडणाऱ्यांना राखी बांधत स्वतःचे व परिवाराची काळजी घेण्याचा मार्गदर्शन करण्यात आले.
क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन अध्यक्ष रूपालीताई शिंदे उपाध्यक्ष साधना गंगावणे खजिनदार स्नेहा धुमाळ,हिंदू बगाटे तसेच इतर पत्रकार बंधू सदस्य हे रक्षाबंधन सामाजिक उपक्रमाला उपस्थित होते.
