ठाणे :- प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे या कार्यालयात महाराष्ट्र वाहन करकायदा १९५९ तसेच मोटार वाहन कायदा १९८८ मधील तरतूदी वापरुन वायुवेग पथकातील अधिकाऱ्यांनी वाहने अटकाव केलेली आहेत. अटकाव केलेली वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे व राज्य परिवहन भिवंडी आगार, भिवंडी, जि.ठाणे येथे असलेल्या जागेत अटकाव केलेल्या स्थितीत ठेवण्यात आली आहेत.
वायूवेग पथकाने अटकावून ठेवलेल्या एकूण 30 वाहनांचा जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतूदी वापरुन प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे या ठिकाणी दि.२० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता Online E-Auction पध्दतीने लिलाव करण्याचे आयोजन केले होते. मात्र काही तांत्रिक कारणास्तव हा लिलाव दि.२८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता Online E-Auction पध्दतीने लिलाव करण्याचे आयोजन केले आहे.
तरी इच्छुकांनी या लिलावात भाग घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे. लिलावाच्या अटी व शर्ती तसेच अनामत रक्कम याबाबतची माहिती लिलावाच्या अगोदर ऑनलाईन प्रसिध्द करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी कळविले आहे.
000000
