मुंबई : नुकत्याच वर्धा (नागपूर) येथे झालेल्या सब ज्युनिअर, ज्युनिअर, सिनिअर राज्यस्तरीय थांग – ता मार्शल आर्ट्स स्पर्धेत फायजा अन्सारी, महेंद्र शर्मा, अभिषेक सहानी, आंचल सहानी यांनी शानदार कामगिरी करताना सुवर्ण पदके जिंकली. ऋतिक मौर्या, झिक्रा शेख यांनी रौप्य आणि सत्यम चौधरी , नोकी अली मोडल यांनी कांस्य पदके मिळवली. पदक विजेत्या खेळाडूंना गौरव अशोक पांचाळ यांचे मार्गदर्शन मिळाले. हे सर्व खेळाडू मालाड, मालवणीच्या आयडियल इंग्लीश हायस्कूल, होली एन्जल हायस्कूल , भवन्स महाविद्यालयात शिकत आहेत. या सर्व खेळाडूंनी या स्पर्धेत मुंबई उपनगर संघाचे प्रतिनिधित्व केले.
