विश्व ज्युनिअर ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा

मुंबई : लुओयांग (Luoyang) चीन येथे २१ ते २५ ऑगस्ट २०२४ दरम्यान होत असलेल्या यूसीआय ज्युनिअर विश्व ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या झायना मोहंमद अली पिरखान हिची भारतीय संघात निवड झाली. ऑस्ट्रेलीयाचे माजी ऑलिंम्पिक पदक विजेते लायकलपट्टू केवीन सिरेउ भारताचे मुख्य प्रशिक्षक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली चार पुरुष आणि सहा महिला सायकलपट्टूंचा भारतीय संघ लुओयांग मध्ये गत दहा दिवसांपासून सराव करत आहे.
सायकलिंग व्हेलोड्रमची कोणतीही सुविधा नसलेल्या पालघर जिल्ह्यामधील झायना राहुल इंटरनॅशनल स्कूल, पालघर मध्ये १२ वी इयत्तेत शिक्षण घेत आहे. सायकलिंग खेळाचा सराव करण्यासाठी तिला नवी दिल्ली, हैदराबाद, जयपूर या ठिकाणी सतत जावे लागते. काही काळ ती पुणे येथे सराव करत असते. २०२३ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत झायानने सुवर्णपदक पटकावले होते. राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत झायनाने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले आहे. राज्य स्पर्धेत ५ सुवर्ण ३ रौप्य आणि १ कांस्य पदक पटकवताना झायनाने आपले राज्य स्पर्धेमधील वर्चस्व सिद्ध केले होते.
भारतीय संघ पुढिलप्रमाणे- वाहेंगबम सिंग, मायांगलांबं मीतेई (दोघे मणिपूर), मायकेल, चेंबरलेन (दोघे अंदमान द्वीपसमुह), सरिता कुमारी (झारखंड), निया सेबस्टेन, अनॅक्सिया मारीया (दोघी केरळ), हर्षिता जाखर (राजस्थान), जे. पी. दहन्यधा (तामिळ नाडू), झायना मोहंमद अली पिरखान (महाराष्ट्र), केवीन सिरेउ (मुख्य प्रशिक्षक, साई – नवी दिल्ली)
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *