विधानसभा निवडणूक तयारीसाठी तलासरी व डहाणू तालुक्यांतील माकप पक्ष कार्यकर्त्यांची सभा
अनिल ठाणेकर

 

ठाणे : येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिटब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे यांच्या उपस्थितीत पालघर जिल्ह्यातील तलासरी आणि डहाणू तालुक्यांतील सभा नुकत्याच संपन्न झाल्या. या सभेला एक हजार माकप पक्ष सदस्य उपस्थित होते.
डहाणू (अज) – पूर्वी जव्हार (अज) – ही जागा १९७८ पासून झालेल्या १० विधानसभा निवडणुकांपैकी ९ निवडणुकांत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जिंकली आहे, आणि तीही ५ वेगवेगळे विजयी उमेदवार देऊन. विद्यमान आमदार माकपचे राज्य सचिवमंडळ सदस्य विनोद निकोले हे २०१९च्या निवडणुकीत प्रथम निवडून आले.पालघर जिल्ह्यातील तलासरी आणि डहाणू तालुक्यांतील या सभा १७ व १८ ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न झाल्या. या सभेला एक हजार माकप पक्ष सदस्य उपस्थित होते. या दोन्ही सभांना माकपचे पॉलिटब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, राज्य सचिव डॉ. उदय नारकर, जिल्हा सचिव किरण गहला, आमदार विनोद निकोले, तलासरी तालुका सचिव लक्ष्मण डोंबरे, डहाणू तालुका सचिव रडका कलांगडा, राज्य कमिटी सदस्य लहानी दौडा, जनवादी महिला संघटनेच्या राज्य सेक्रेटरी व माकप राज्य कमिटी सदस्य प्राची हातिवलेकर इत्यादींनी संबोधित केले. देशातील आणि राज्यातील सद्य राजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (इंडिया) व माकपला विजयी करण्याचा आणि भाजप-रालोआला पराभूत करण्याचा निर्धार दोन्ही सभांनी केला. डहाणू विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या तलासरी व डहाणू या दोन्ही तालुक्यांत संघर्षाचे आणि संघटनेचे ठोस कार्यक्रम निश्चित करण्यात आले. यावेळी माकपचे साप्ताहिक जीवनमार्ग आणि जनशक्ती प्रकाशनाची पुस्तके यांची पाच हजार रुपयांची विक्री झाली.
००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *