सलमान पठाण

 

मुंबई : प्रजा फाउंडेशनच्या मुंबईतील आमदाराचे प्रगती पुस्तक 2024 हा अहवाल 20 ऑगस्ट रोजी मुंबई प्रेस क्लब येथे प्रकाशित करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळ कामकाजाचा इतिहास गौरवशाली आणि इतर राज्यांना आदर्श घालून देणारा राहिला आहे मात्र गेल्या काही वर्षात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे प्रमुख पक्षातील फुटी आणि बदलती राज्य सरकारे यांचा प्रतिकूल परिणाम इथल्या राजकीय समीकरणावर आणि विधिमंडळातील कामकाजावर झालेला आहे
प्रजा फाउंडेशन संस्थेकडून करण्यात आलेल्या मुंबईतील आमदाराचे प्रगती पुस्तक 2024 या अहवालात मुंबईत महाविकास आघाडीच्या आमदारांची सरशी दिसून येत आहे.
अर्थसंकल्पीय सत्र 2023 ते 2024 या वर्षभरात आमदाराच्या कामगिरीचे मूल्यमापन केले आहे यात काँग्रेसचे आमदार अमीन पटेल प्रथम क्रमांका वर असून उबाठा गटाचे सुनील प्रभू हे दुसऱ्या क्रमांकावर आहे तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या आहेत. मात्र सत्ताधारी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यापैकी भाजप च्या एक मात्र मनीषा चौधरी या टॉप 5 मधून चौथ्या क्रमांकावर आहे..
त्याचबरोबर आमदाराच्या कामगिरीवरून राजकीय पक्षाचा विचार केला तर 72 % मिळवून काँग्रेस पक्ष प्रथम क्रमांकावर तर सत्ताधारी भाजपा 60 % सह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
देशाच्या विविध राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र विधानसभा मध्ये सर्वात कमी काम काज 2019 ते 2024 या पाच वर्षात फक्त 119 दिवस झालेले आहेत तर सर्वाधिक कामकाज 2009 ते 2024 मध्ये 210 दिवस झालेले होते तर 2014 ते 2019 मध्ये 206 दिवस हे कामकाज झाले होते व त्या बरोबरच
12 व्या विधनसेभत 2009ते 2014 दरम्यान सर्व सदस्यांची उपस्थिती 89 टक्के होती व एकूण प्रश्न ते 40512 विचारले गेले होते तर 13 व्या विधानसभेत फक्त एक टक्का कमी होती परंतु 22404 विचारण्यात आले होते मागच्या वेळेच्या तुलनेत 43% टक्के ही घट होती तर सर्वात जास्त घर 14 व्या विधानसभेत तब्बल तर 73% घट झाली आहे या सत्रात फक्त 11,132 प्रश्न विचारण्यात आले आहे. अशी माहिती प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून समोर आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *