‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी आलेल्या अर्जांच्या ऑनलाईन पडताळणीचे काम ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. अरविंद पेंडसे सभागृहात सुरू आहे. या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी केली. अर्जांच्या पडताळणीची पद्धत, त्याची पोर्टलवरील नोंद याच्याबद्दलची माहिती आयुक्त राव यांनी जाणून घेतली. यावेळी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त अनघा कदम, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, संगणक विभागाचे नितीन डुंबरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *