माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांचा जयंतीदिन हा देशभरात सद्भावना दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने ठाणे महापालिका मुख्यालयात कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात त्यांच्या प्रतिमेला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर, सद्भावना दिनानिमित्त विशेष प्रतिज्ञाही घेण्यात आली. यावेळी माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर तसेच महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
