ठाणे : महानगरपालिका हद्दीतील नौपाडा कोपरी प्रभाग समिती परिसरातून अनधिकृत फेरीवाल्यासंदर्भात वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने आज नौपाडा कोपरी परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करून सदरचा परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आला.
नौपाडा कोपरी प्रभाग समितीतील नारायण कोळी चौक, अष्टविनायक चौक, १२ बंगला परिसर, ठाणेकर वाडी, ठाणे रेल्वे स्टेशन (पूर्व) १५०मी. परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान अनधिकृत फेरीवाले यांच्या २० हातगाड्या जप्त करण्यात आल्या व पदपथावर अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करून सदरचा परिसर स्वच्छ आणि फेरीवाला मुक्त करण्यात आला. सदरची कारवाई उपायुक्त परिमंडळ २ चे उपायुक्त शंकर पाटोळे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांचे मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागामार्फत करण्यात आली.
