मुंबई : राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत त्यांचा राजीनामा मागितला आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी असल्याचं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.
राज्यात सध्या विविध भागात गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. या घटनावरुन विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका करताना दिसत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत विरोधक सरकारवर प्रहार करत आहेत. अशातच आता पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
