मुंबई : बदलापूरच्या घटनेला राजकारण म्हणणारे विकृत आहेत… दुर्दैवाने जर मुख्यमंत्र्यांनासुद्धा यात राजकारण दिसत असेल तर ते विकृतच असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कडाडून टीका केली आहे.
बदलापुरमधिल चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या निषेधासाठी पुकारण्यात आलेला शनिवारचा म्हणजे २४ ऑगस्टचा महाराष्ट्र बंद हा राजकीय नाही तर समाजाची उत्स्फुर्त प्रतिक्रीया आहे असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यात सध्या विकृतीचा व्हायरस पसरला आहे. ठाणे जिल्हा हे मुख्यमंत्री यांचे घरं आहे. हे दुष्कृत्य ते मान्य करताय का? पोलिस ढिम्म आहेत म्हणून जनता पेटून उठली. नाहीतर काय करणार.. मुख्यमंत्री कुठे होते? ते रत्नागिरीमध्ये राख्या बांधत होते… त्या राख्यांना तरी जागा …मुख्यमंत्री यांना बदलापूरला जायचं होतं तर हे रत्नगिरीमध्ये जाऊन बसले त्यात गुलाबी जॅकेट सुद्धा होतं , असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, घटनाबाह्य मुख्यमंत्री तुम्ही थोडे दिन के मेहमान हो… मुख्यमंत्री म्हणत असतील दोन महिन्यात फाशी दिली एका आरोपीला तर त्याची SIT नेमा आणि कोणाला फाशी दिली ते सांगा… क्षमता नसलेला हा मुख्यमंत्री आहे.
शक्ती विधेयक आम्ही आणणार होतो. शक्ती विधेयक आम्ही आणले म्हणूनच सरकार पडलं का? बदलापूरला मला जायचं आहे. मी बदलापूरला जाईन पण सध्या त्या पालकांना मला त्रास द्यायचा नाही…. मी काही स्थानिकांना बोलवलं आहे… काही आमचे पदाधिकारी यांना सुद्धा बोलवलं आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
