डिवाईन विन्सपायर फाउंडेशनच्या
मुंबई :
खाजगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणे सामान्यांसाठी खर्चिक असल तरी, भांडुप परिसरात अल्प किमतीत उपचार मिळावेत यासाठी रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. डिवाईन विन्सपायर फाउंडेशन यांच्या ‘एन व्ही झाल्टे मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटल’चे उद्घाटन नुकतच झाले असून, या हॉस्पिटल मध्ये जनरल फिजिशियन, आर्थो, डेंटल सोनोग्राफी, इसिजी सारख्या अनेक गोष्टी चॅरिटेबल दरात करण्याची सोय आहे.
भांडुप पश्चिम फरीद नगर, बी पी ई एस शाळे जवळ डिवाईन विन्सपायर फाउंडेशन यांचे एन व्ही झालटे मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटल चालू करण्यात आले आहे. या हॉस्पिटलच्या उद्घाटनाचे सूत्रसंचालन श्री किरण खोत यांनी केले तसेच या प्रसंगी स्पिरिच्युअल बिजनेस कोच श्री. शशिकांत खामकर, विनर्स एजुकेशन चॅरिटेबल ट्रस्ट च्या सौ. ज्योती खामकर, खासदार संजय दिना पाटील, आमदार श्री रमेश कोरगावकर, माजी आमदार श्री अशोक पाटील, सिनिअर पोलीस ऑफिसर श्री दत्तात्रय खंडागळे, पराग विद्यालयाचे संस्थापक श्री बाळकृष्ण बने , श्री भास्कर विचारे, श्री भास्कर विचारे, श्री संदिपभाई जळगावकर, सौ. जागृतीताई पाटील , सौ. प्रांजलताई जाधव आणि ॲड. धनंजय भोसले इ. मान्यवर उपस्थित होते. चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून या हॉस्पिटल मध्ये उपचार केले जाणार आहे. सर्वसामान्यांना स्वस्तात उपचार मिळावेत या एका हेतून हॉस्पिटल चालू करण्यात आले असल्याची माहिती डिवाईन विन्सपायर फाउंडेशन चे संस्थापक डॉ. आशिष दामा,सौ. कविता बागवे, श्री. वैभव बागवे, श्री. गौतम पटाडे, श्री. अविनाश चौगुले आणि सौ. राणी कुशारे दिली.
हॉस्पिटल मध्ये जनरल फिजिशियन, आर्थो, डेंटल सोनोग्राफी, इसिजी, बालरोग, त्वचारोग, स्त्रीरोग, लसी करण आदो अद्यावत सुविधा ठेवण्यात आल्या असून, तज्ञ डॉक्टर या हॉस्पिटल मध्ये रुग्णांवर उपचार करणार आहेत.
0000