मुंबई : येत्या २५ ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची हवामान खात्याची माहिती आहे. त्यामुळे यंदाची दहीहंडी ही पावसाशिवाय होणार आहे. नेमक्या दहीहंडीच्या दिवशी पाऊस दांडी मारणार आहे.
येत्या २६ ते ३० ऑगस्ट यादरम्यान, पुन्हा उष्णतेचा पारा चढणार आहे. तर ३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान पुन्हा पावसाची शक्यता असेल.
२५ ऑगस्टपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता कायम असेल. विशेषतः शनिवार दिनांक 24 ऑगस्टला नाशिक नंदुरबार धुळे जळगांव पुणे सातारा कोल्हापूर मुंबई ठाणे रायगड अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या १६ जिल्ह्यात तर रविवारी दिनांक २५ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात दुपारनंतर गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता असेल. तर सोमवार दिनांक २६ ते शुक्रवार ३० ऑगस्ट दरम्यानच्या पाच दिवसादरम्यान कमाल तापमान वाढीबरोबर महाराष्ट्रात पुन्हा उन्हाचा पारा चढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.