न्यायालयाचा आदर राखत महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद मागे ० आता राज्यभरात निषेध आंदोलने

   मुंबई  : बदलापुरमधिल शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधात शनिवार दिनांक २४ मार्च रोजी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद न्यायालयाच्या विरोधानंतर मागे घेण्यात आला आहे. न्यायालयाने बंदला बंदी घातल्यामुळे आता शनिवारी राज्यभर हाताची घडी आणि तोंडावर काळी पट्टी बांधून मुक निर्दशने करण्यात येणार आहेत. स्वता ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनाभवनाबाहेरील चौकत तोंडाला काळी पट्ट् लावून मुक निर्दशन करणार आहेत. दरम्यान जनतेने जर उत्स्फुर्त बंद केल्यास त्याला आम्ही जबाबदार नसू अशी राजकीय प्रतिक्रीया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्यामुळे बंदबाबतचा संभ्रम कायम आहे. दरम्यान  ठाणे येथे कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेतर पुणे येथे शरद पवार यांच्या नेतृत्वात  निषेध आंदोलन होणार आहे.

महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद ची हाक दिली त्यामुळे राज्यातील महायुती सरकारला धडकी भरली होती. त्यामुळेच सरकार पुरस्कृत लोकांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. त्यावर कोर्टाने कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा  अधिकार नाही. तरीही बंद झाल्यास कायदेशीर कारवाई करा.असे आदेश आज दिले.  यानंतर आम्ही कोणतेही बेकायदेशीर काम करणार नाही. आमचा बंद शांततेच्या मार्गानेच होणार. आम्हाला निषेध नोंदविण्याचा अधिकार आहे तो आम्ही शांतता पुर्वक पाळणार आहोत. न्यायालयाचा आदर करीत आम्ही काळ्या फिती लावून राज्यभरात एक तास निषेध आंदोलन करणार असल्याचे कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले तर जनतेने उत्सफुर्त बंद केल्यास आम्ही जबाबदार नाही. असे ठामपणे सांगितले.

 बदलापुर मधील चिमुकल्यावरील  अत्याचार प्रकरणी उद्या २४ तारखेला ११ ते १२ वाजेपर्यंत महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते तोंडाला काळ्या पट्या हातात काळे झेंडे घेऊन सकाळी ११ वाजता ठाणे येथे आंदोलन करणार आहेत. राज्यातील प्रमुख शहारात आमचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते शहरातील नाका नाक्यावर गाव तालुक्या ठिकाणी तोंडावर काळ्या पट्ट्या हातात काळे झेंडे घेऊन आंदोलन करणार असल्याचे कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

      बंद मागे घेण्याच्या बाबतीत न्याय देताना न्यायालयाने जेवढी तत्परता दाखविली तशीच तत्परता या गुन्ह्याप्रकरणी न्याय देण्यासंबधात दाखवावी. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. न्यायालयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाता आलं असतं मात्र पुरेसा वेळ नाही. आम्ही बंद करा म्हणजे तोडफोड करा बेकायदेशीर पणे काही करा असे काही नव्हतं. उत्स्फुर्तपणे बंद करा, शांततेने बंद करा असं आवाहन केलं होते. त्याला आता तुम्ही मनाई केली तर तोंडं बंद करून बसतो. मात्र राज्यातील अत्याचारा विरोधातले आंदोलन थांबणार नाही असे ठाकरे म्हणाले.

बंद करायचा नाही, संप करायचा नाही केला तर ते बेकायदेशीर ठरविले जात असेल तर मग अशा प्रसंगी लोकशाहीत कोणत्या पद्धतीने व्यक्त होण्यासाठी निषेध व्यक्त करण्यासाठी काय करावे लागेल म्हणजे त्याला मान्यता मिळेल असे ठाकरे म्हणाले. मी उद्या २४ तारखेला शिवसेना भवना समोरील चौकात तोंडाला काळी पट्टी आणि हातात काळा झेंडा घेऊन बसणार आहे. असे ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *