बदलापूरमधिल शाळेत दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण झाल्याच्या गुन्ह्यासाठी विशेष तपास समितीने बदलापूरच्या शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. Pocso Act च्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
एसआयटीने हे म्हटलं आहे की शाळा प्रशासनाने या प्रकरणाची माहिती मिळूनही पोलीस तक्रार केली नाही. पीडित मुलीच्या पालकांनी शाळेशी संपर्क केला होता. तरीही शाळेने योग्य पावलं उचलली नाहीत. एसआयडीने पॉक्सो कायद्याच्या २१ व्या सूचीनुसार हा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये लहान मुलाविरोधातला गुन्हा ठाऊक झाल्यानंतर त्यासंदर्भात कुणीही तक्रार करु शकतं. ती न केल्यास या सूची अंतर्गत गुन्हा दाखल होतो. या प्रकरणात शाळेने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत बदलापूरकरांनी कारवाईची मागणी केली होती. तसंच स्थानिक नेते आणि विरोधी पक्षातील नेत्यांनीही मागणी केली होती. ज्यानंतर आता एसआयटीने हे पाऊल उचललं आहे.