सारा वर्तकने ३ रौप्य पदकांसह २ कांस्य पदके पटकावली

बँकॉक येथे पार पडलेल्या स्पर्धेत १४ राष्ट्रांच्या ६०० जलतरणपटूंचा सहभाग

राज भंडारी

पनवेल : बँकॉक येथे सुरू असलेल्या आशियाई शालेय निमंत्रित २५ मीटर जलतरण स्पर्धेत महाराष्ट्र जलतरण संघटनेच्या जलतरणपटूंनी प्रत्येकी सात सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी एकूण २१ पदकांची कमाई केली. यामध्ये पनवेलमधील कर्नाळा स्पोर्ट्स ॲकॅडमीची खेळाडू सारा वर्तक हिने ३ रौप्य आणि २ कांस्य पदकाची मिळून एकूण ५ पदके मिळवली. तिच्यातील आत्मविश्वास तिला स्पर्धेत टिकविण्यासाठी सरस ठरला असल्याची प्रतिक्रिया सारा हिने बोलताना स्पष्ट केले.

आशियायी जलतरण स्पर्धेत एकूण १४ राष्ट्रांच्या ६०० जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत १९ वर्षांवरील मुलांमध्ये इचलकरंजीच्या सर्वेश गुरवने २०० मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात कांस्यपदक पटकाविले. या पदकाद्वारे महाराष्ट्राचे खाते उघडले. त्यानंतर त्याने २५ मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्ण, तर २०० मीटर बटरफ्लायमध्ये रौप्यपदक मिळवले. ठाण्याच्या राघवी रामानुजनने तीन सुवर्ण, एक कांस्य, तर मुंबईच्या अथर्व म्हात्रेने प्रत्येकी एक सुवर्ण, कांस्य, पुण्याच्या श्रीलेखा पारिखने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य, नंदिनी पेटकरने प्रत्येकी एक रौप्य, कांस्यपदकाची कमाई केली. शिवांशू कोर्तेने एक रौप्य, अर्जुन नाईकने एक कांस्य, ठाण्याच्या अर्जुन श्रीवास्तवने प्रत्येकी एक सुवर्ण, रौप्य, तर रायगड जिल्ह्यातील पनवेलच्या सारा वर्तकने तीन रौप्य आणि दोन कांस्यपदकाची कमाई केली.

कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमधील सर्वात लहान जलतरणपटू म्हणून कु. सारा अभिजीत वर्तक आहे. अवघ्या ६ वर्षांच्या साराने बँकॉक येथे झालेल्या आशियायाई शालेय जलतरण स्पर्धेत वयोगट 6 मध्ये भारतामधून महाराष्ट्र जलतरण संघाचे प्रतनिधीत्व करणाऱ्या स्पर्धकांमध्ये स्थान मिळविले. तिला मिळालेल्या पहिल्याच संधीमध्ये तिने 3 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *