मुंबई : जिजामातानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सन २०२४ -सन २०२५ ची कार्यकारिणीची निवड जाहिर करण्यात आली असून मंडळाच्या अध्यक्षपदी सुशील मनोज साळसकर यांची तर सरचिटणीसपदी मंगेश घेगडे यांची निवड करण्यात आली.
जिजामातानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे कामगार विभागातील प्रख्यात मंडळ असून या मंडळ आजवर धार्मिक तसेच राष्ट्रीय व विविध सामाजिक विषयांवर आधारित देखावे सादर करून समाजप्रबोधनाचे कार्य करण्यासाठी सुपरिचीत आहे. भूकंप , पूर यासारख्या नैसर्गिक आपत्ती प्रसंगी मदतनिधी देऊन आपल्यापरीने खारीचा वाटा उचलून आपले सामाजिक दायित्व बजावण्याचं कामही हे मंडळ करीत असते.
यंदा मंडळाचे हे ७३ वे वर्ष असून मंडळाची ७२वी वार्षिक सभा मंडळाचे विश्वस्त महेश पावसकर,प्रशांत सुर्वे,राजू नाईक यांंच्या उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली. या सभेत सन २०२४ ते सन २०२५ या वर्षासाठी कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली.कार्यकारी मंडळ पुढीलप्रमाणे.अध्यक्ष- सुशील मनोज साळसकर कार्याध्यक्ष – सुनिल जुवळे. उप कार्याध्यक्ष – ऋषिकेश खोत, कल्पेश नागे, अक्षय गोसावी. उपाध्यक्ष -राहूल कदम,वैभव गवस,अभिनय राणे. सरचिटणीस- मंगेश घेगडे चिटणीस- शुभम घाटगे,सिद्धार्थ कदम,अभिषेक नलावडे. खजिनदार- संदीप मेंगडे.हिशोब तपासणीस- राकेश खानविलकर.