मुख्यमंत्र्यांची मदतीची घोषणा
जळगाव: नेपाळ येथील काठमांडू येथे देवदर्शनासाठी जात असताना भाविकांची बस दरीत कोसळली होती. या दुर्दैवी अपघातात जळगावच्या 26 भाविकांचा मृत्यू झाला. या नेपाळ येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्याच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे ५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
अपघातातील मृतांवर जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वरणगाव, तलवेळ, सुश्री गावात एकाच वेळी अंत्य संस्कार करण्यात आलेत.
नेपाळमध्ये देवदर्शनासाठी जळगावच्या वरणगावमधील अनेकजण गेले होते. यापैकी एक बस दरीत कोसळली होती. तर दुसऱ्या बसमधील भाविक सुखरुप आहेत. त्यांना गोरखपूर येथून विशेष विमानाने जळगावला आणण्यात येईल. काल आणण्यात आलेल्या मृतदेहांसाठी २६ स्वतंत्र अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली होती.