जळगाव : महिलांवर अत्याचार हा अक्षम्य अपराध आहे. तो करणारा कोणीही असो, तो सुटता कामा नये, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जळगाव येथे लखपती दीदी कार्यक्रम पार पडला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, आज तिन्ही सैन्य दलात महिला अधिकारी आहेत. फायटर, पायलट महिला बनत आहेत. नारिशक्ती नवा कायदा बनवला. राजकारणात महिलांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले. सुरक्षेसाठी महत्व दिले.

महिलांवर अत्याचार करणाऱ्या दोषीला कुठल्याही प्रकारे मदत करणारेही वाचता कामा नये. त्यांच्यावरही कारवाई झालीच पाहिजे. सरकार येतील अन् जातील, पण नारी शक्तीकडे लक्ष दिले पाहिजे. महिलांच्या रक्षणासाठी कायदे कठोर केले जात आहे. एफआयआर होत नाही, वेळ लागतो अशा अडचणी येत होत्या. मात्र आता अनेक अडचणी आम्ही न्याय संहितामधून दूर केल्या आहेत. ई-एफआयआर सुरू केल्या आहे. याने गडबड होणार नाही, आता जलद प्रतिसाद मिळेल. फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा दिली जात आहे. लग्नाच्या नावे फसवणूक होत होती, त्याबाबत कायदा केला आहे. महिलांच्या समस्यांसाठी केंद्र सरकार हे राज्य सरकारच्या सोबत आहे, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र विकसित भारताचा चमकता तारा आहे. गुंतवणूकीसाठी आणि नोकरीसाठी चांगला आहे. महायुतीचे सरकार म्हणजे उद्योग आणि नोकरीची गॅरंटी आहे. अनेक वर्ष स्थिर सरकारसाठी महायुतीच्या सरकारची गरज आहे. इथल्या महिला माझी साथ देतील, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

संवेदनहीन प्रधानमंत्री- पटोले

नेपाळमध्ये तीर्थक्षेत्रासाठी गेलेल्या जळगाव मधील २६ नागरिकांचा अपघातात मृत्यू झालाय. अवघ्या जळगावावर शोककळा पसरली आहे थोडीशी भावना, थोडीशी तरी माणुसकी असती तर भाजपने आणि पंतप्रधानांनी हा कार्यक्रम रद्द केला असता. एकीकडे जनतेच्या डोळ्यात अश्रू आणि एकीकडे मोदी उत्साह साजरा करत आहेत. मोदींच्या रुपाने सर्वात संवेदनहीन प्रधानमंत्री या देशाने पाहिला आहे. हा कार्यक्रम जनतेच्या पैशाने होतोय. शासकीय कार्यक्रम आहे. एकीकडे महाराष्ट्राचे जनतेच्या डोळ्यात अश्रू आणि दुसरीकडे त्यांच्याच पैशाने कार्यक्रम घेऊन मीठ चोळत आहेत का? असा सवाल नाना पटोले यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *