Month: August 2024

अल्पवयीन शालेय विध्यार्थीनींच्या लैंगिक अत्याचारा निषेधार्थ मुरबाडमध्ये आक्रोश मोर्चा

राजीव चंदने   मुरबाड : बदलापूर शहरातील आदर्श विदयालयातील विध्यार्थीनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ मुरबाड मध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आले होते. बदलापूर येथील तीन वर्षाच्या अल्पवयीन विध्यार्थीनींवर त्याच शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे या नराधमाने लैंगिक शोषण करून अत्याचार केल्याची घटना 13 ऑगस्ट रोजी घडली होती. ह्या घटनेच्या निषेधार्थ मुरबाड शहरातील विदयालय महाविद्यालय जि. प. शाळेतील विध्यार्थी, शिक्षक, व पालक नागरिकांनी माजी नगराध्यक्ष रामचंद्र दुधाळे यांच्या नेतृत्वाखाली तीन हात नाका ते छ. शिवाजी महाराज चौकापर्यंत जनआक्रोश आंदोलन करून निषेध व्यक्त केला. या क्रूर घटनेचा संताप व्यक्त करत मुरबाड मधून विविध सामाजिक, राजकीय, संघटना व तालुक्यातील पत्रकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी  मुरबाड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांची भेट घेऊन निवेदने दिले. या अत्याचार घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे,दरम्यान या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकारा सोबत बदलापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी गलिच्छ व अपशब्दाचा वापर केल्याचा हि निषेध व्यक्त केला आहे. तसेच मुरबाड शहरातील खासगी व मोठ्या शाळांमधील सफाई कर्मचारी, स्कुल बस, वाहन चालक, त्यांचे मदतनीस, वॉचमन यांची ओळखपत्रे संबंधित शाळांकडून मागवून तथा अशा दुर्दैवी घटना टाळण्याकरिता संबंधित शाळांना भेट देण्याबाबत नमूद केले आहे.

जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख २५ लाखाचे पारितोषिक

महाराष्ट्रातही आरोपीवर २१ दिवसात शिक्षेची तरतूद करण्याचा कायदा आणा – आमदार प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर   दहीहंडी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही दहीहंडी सण मोठ्या…

महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंद आंदोलनाला रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)चा पाठिंबा

मुंबई: बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर शाळेमध्ये दोन लहान विद्यार्थींनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे. उपेंद्रजी शेंडे यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन…

आनंदपार्क येथे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना मोफत छञी वाटप

ठाणे :आनंदपार्क येथील देवी मंडपात ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून शिवसेना उपनेते स्व. अनंत तरे व महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष स्व. जयेश अनंत तरे यांच्या स्मरणार्थ शिवसेना उध्दव बाळासाहेव…

शासकीय कर्मचाऱ्यांचा २९ ऑगस्टपासून बेमुदत संप      

जुनी पेन्शन आणि अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने गतवर्षी मार्च आणि डिसेंबर मध्ये दोन वेळा बेमुदत संप पुकारला होता. राज्यातील १७ लक्ष सरकारी कर्मचारी आणि शिक्षक या संपात संपूर्णत: सहभागी झाले होते. या संपाच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जुन्या पेन्शनचे बहुतांश लाभ देय असलेली सुधारीत पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा विधिमंडळ अधिवेशनात केली. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने याबाबतची कार्यवाही झाली नाही. तदनंतर संघटनेने वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप पर्यंत सुधारीत पेन्शन योजनेची अधिसूचना अथवा शासन निर्णय पारीत करण्यात आलेला नाही. या दिरंगाईमुळे राज्यातील ८ लक्ष सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये अस्वस्थता आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे.  नजिकच्या काळात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने कर्मचारी आणि शिक्षकांच्या चिंतेत भरच पडली आहे. याबरोबरच कंत्राटीकरण, खाजगीकरण रद्द करुन सदर कामगारांना सेवेत कायम करावे, सर्व रिक्त पदे भरण्यात यावीत. अनुकंपा भरतीला प्राधान्य द्यावे, वेतनत्रुटींचे निराकरण व्हावे, केंद्रीय कर्मचाऱ्यां प्रमाणे उपदानात महागाई भत्ता मिळावा, पेन्शन विक्री पुनर्स्थापना १२ वर्षांची करावी.चतुर्थश्रेणी आणि वाहनचालक भरती पुर्ववत करावी, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या रोखलेल्या पदोन्नत्या पुन्हा सुरू कराव्यात, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे.महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षे बालसंगोपन रजा मिळावी आदी मागण्यांसाठी दिनांक १२ ऑगस्ट रोजी मा मुख्यमंत्री आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांना बेमुदत संपाची नोटीस देण्यात आली आहे. अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी दिली आहे. मुंबईत मंत्रालयासह सर्व शासकीय रुग्णालये , RTO, शासकीय मुद्रणालय, वस्तू व सेवा कर विभाग आणि अन्य शासकीय कार्यालयात संपाची जोरदार तयारी सुरू असल्याचेही अविनाश दौंड यांनी सांगितले आहे. राज्य शासनाने या निदर्शनांची दखल घेऊन तातडीने पेन्शन बाबतची अधिसूचना काढावी तसेच अन्य मागण्यांबाबत सकारात्मक विचार करावा अन्यथा  बेमुदत संप अटळ आहे असा इशारा अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी दिला आहे

 अकरावी प्रवेश- तिसरी विशेष प्रवेश यादी जाहीर

 ८ हजार ६८४ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय   मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी प्रवेशाची तिसरी विशेष प्रवेश यादी गुरूवार, २२ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली. या यादीअंतर्गत विविध महाविद्यालयांतील १ लाख १८ हजार ९३९ जागांसाठी १७ हजार ४८८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १३ हजार १४५ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले. तर तिसऱ्या विशेष फेरीत अर्ज केलेल्या ४ हजार ३४३ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळण्याची प्रतीक्षा आहे. तसेच ८ हजार ६८४ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, १ हजार ७५२ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे आणि ९२९ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय देण्यात आले आहे. सर्व जागांवर प्रवेश निश्चित झाल्यामुळे काही महाविद्यालयांची संबंधित शाखांसाठीची तिसरी विशेष प्रवेश यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे नामांकित व आवडीच्या महाविद्यालयांत प्रवेश मिळवण्याची काही विद्यार्थ्यांची संधी हुकली. तसेच दुसऱ्या विशेष फेरीच्या तुलनेत तिसऱ्या विशेष प्रवेश यादीअंतर्गत वाणिज्य शाखेसाठीचे प्रवेश पात्रता गुण (कट ऑफ) स्थिर असून १ ते २ टक्क्यांनी किंचितशी घट झाली आहे. तसेच काही महाविद्यालयांच्या कला व विज्ञान शाखेसाठीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये ३ ते ४ टक्क्यांची घट, तर काही महाविद्यालयांचे प्रवेश पात्रता गुण १ ते २ टक्क्यांनी वाढले आहेत. पहिल्या तीन नियमित प्रवेश फेऱ्यांच्या तुलनेत तीनही विशेष फेरींच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये कमालीचे चढ – उतार पाहायला मिळत असून अकरावीच्या प्रवेश फेरीमध्ये प्रवेशासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. तिसऱ्या विशेष प्रवेश यादीअंतर्गत चर्चगेट येथील एच. आर. महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी ८७.८ टक्के, के. सी. महाविद्यालयात कला शाखेसाठी ५२.४ टक्के, वाणिज्य शाखेसाठी ८७.२ टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ७०.६ टक्के, जय हिंद महाविद्यालयात कला शाखेसाठी ७१.०० टक्के, वाणिज्य शाखेसाठी ८७.२ टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ७१.२ टक्के, फोर्ट येथील सेंट झेविअर्स महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी ८६.०० टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ८२.६ टक्के, माटुंग्यातील रुईया महाविद्यालयांत कला शाखेसाठी ७९.८ टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ८२.०० टक्के, रुपारेल महाविद्यालयांत कला शाखेसाठी ८२.४ टक्के, वाणिज्य शाखेसाठी ८४.८ टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ८४.४ टक्के, शीव येथील एसआयईएस वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी ८१.४ टक्के, विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयांत कला शाखेसाठी ७१.२ टक्के, वाणिज्य शाखेसाठी ८५.०० टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ८१.८ टक्के, मिठीबाई महाविद्यालयात विज्ञान शाखेसाठी ७६.८ टक्के, एन. एम. महाविद्यालयांत वाणिज्य शाखेसाठी ९२.०० टक्के प्रवेश पात्रता गुण असतील. आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार तिसऱ्या विशेष प्रवेश फेरीनुसार केंद्रीय प्रवेश प्रक्रिया, संस्थात्मक, अल्पसंख्यांक, व्यवस्थापन कोटाअंतर्गत आणि द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवार, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचा असल्यास स्वतःच्या लॉगिमधील ‘अपलोड रिक्वॉयर्ड डॉक्युमेंट्स’ या पर्यायावर क्लिक करून कागदपत्रे अपलोड करावीत आणि ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’ या पर्यायावर क्लिक करून संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा. 000000

‘मेट्रो १’मधून १० वर्षांत १०० कोटी प्रवाशांचा प्रवास

मुंबई : ‘वर्सोवा – अंधेरी – घाटकोपर मेट्रो १’मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्येने १३ ऑगस्ट रोजी पाच लाखांचा टप्पा पार केला. गेल्या…

महिला व मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या – श्रमजीवी संघटना

ठाणे : महिला व मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाविरोधी फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये निर्णय घेवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गशनाखाली माजिवडा-मानपाडा प्रभाग…

 २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हा – प्राची हातिवलेकर

 बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ अनिल ठाणेकर ठाणे : बदलापूरच्या शाळेत कोवळ्या चिमुरड्यांवर झालेला अत्याचार मन सुन्न करणारा आहे पण हा गुन्हा दडवू पाहणारे शाळेचे संस्थाचालक सोडून पोलिसांनी आंदोलकांवरच लाठीचार्ज केला आणि त्यांनाच तुरुंगात डांबले. या सगळ्या प्रकारांनी व्यथित होऊन महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद ची दिलेली हाक, हे एक स्वागतार्ह पाऊल आहे. जनवादी महिला संघटना या निर्णयाचे स्वागत करते. संघटनेच्या सर्व शाखांनी आपल्या जास्तीत जास्त सभासदांना घेऊन रस्त्यावर उतरावे आणि या बंद मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची राज्य कमिटीच्या अध्यक्षा नसीमा शेख व राज्य सरचिटणीस प्राची हातिवलेकर यांनी केले आहे. बदलापूरच्या शाळेत कोवळ्या चिमुरड्यांवर झालेला अत्याचार मन सुन्न करणारा आहे. अर्थात मन सुन्न करणाऱ्या घटना सध्या तर दिवसागणिक घडत आहेत. काही चव्हाट्यावर येतात. मग माध्यमे, जनता यांनी आरडाओरड केली की थोड्या वेळासाठी आरोपींना अटक करणे, कडक कारवाईचे आश्वासन देणे हा सोपस्कार होतो. अंकिता म्हात्रेवर तर देवाच्या दरबारात त्याची पूजा करणाऱ्यांनीच सामूहिक बलात्कार आणि खून केला. यशश्री शिंदे, श्रद्धा भोईर, वसईतील तरुणी एकतर्फी प्रेमाच्या शिकार. दिवसागणिक या घटना वाढतच आहेत. बदलापुरातील घटनेनंतर जनतेचा उद्रेक होऊन तिने जबरदस्त आंदोलन केले. ते उत्स्फूर्त होते. मात्र संवेदनशीलता मुळातच नसलेल्या मुख्यमंत्र्यांनी हे आंदोलन राजकीय असल्याचा आणि त्यासाठी बाहेरून लोक आणल्याचा साचेबद्ध आरोप केला. अटक झालेले सगळे नागरिक बदलापूर येथीलच असल्याचे सिद्ध झाल्याने या आरोपातील हवा निघाली. महिलांच्या, आणि एकूणच नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ लाडक्या बहिणींचे देवा भाऊ तर दिल्लीत होते. त्यांना असल्या फालतू घटनांशी काहीही सोयरसूतक नाही आणि का असावे? विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर देवा भाऊंच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे युतीतील धुसफूस, उमेदवारीसाठी पक्षांतर्गत रस्सीखेच, मतदारांना विकत घेऊ पाहणाऱ्या सवंग योजना आणि त्यासाठी दिल्लीश्वरांची मर्जी राखणे, हे सगळे सोडून ते दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराची दखल का घेतील? घेतलीही असती हो, पण शाळा पडली आपलीच, म्हणजे संस्कारी. आणि बलात्कार हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, तो नष्ट होऊ शकत नाही, असे त्यांच्याच पक्षाच्या विदुषी, पडद्यावर सशक्त महिलेच्या भूमिका करणाऱ्या व खासदार असणाऱ्या एका अभिनेत्रीने म्हणूनच ठेवले आहे. पोलिसांबद्दल काय बोलावे? ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी, अशी त्यांची स्वच्छ आणि सोपी भूमिका. भाजप-रास्वसंघ चालवत असलेल्या शाळेच्या इमारतीत झालेल्या अत्याचाराची दखल घेऊन गुन्हा दाखल करून घेण्याचा अर्थ काय? इतके न कळण्याइतके पोलीस दूधखुळे नक्कीच नाहीत. मग उरले कोण? पालक आणि सामान्य नागरिक, ज्यांना आपल्या मुलींच्या सुरक्षिततेची खरी चिंता आहे तेच. आणि आंदोलन करण्यापलीकडे त्यांच्या तरी हातात काय आहे? असा संतापजनक प्रश्न अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य कमिटीच्या अध्यक्षा नसीमा शेख व राज्य सरचिटणीस प्राची हातिवलेकर यांनी केला आहे. ०००००

विना परवानगी सुरू असलेले पॉड हॉटेलचे बांधकाम त्वरित थांबवा-मनोज खेडकर

माथेरान : मध्य रेल्वेने माथेरान रेल्वे स्टेशन परिसरात जुन्या हेरिटेज वास्तूमध्ये अनधिकृतपणे तोडफोड करून अनधिकृतपणे पॉड हॉटेलचे बांधकाम सुरू केले आहे यासाठी हेरिटेज कमिटी व नगर परिषदेची परवानगी घेतलेली नाही…