सेवाव्रती उषा केळकर आणि बलुकाका पेंडसे यांचा न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते गौरव
ठाणे : मो. ह. विद्यालयाची जवळपास तीन ते चार दशके निरलसपणे सेवा केलेल्या सेवाव्रती उषा मुकुंद केळकर आणि गणेश हरी उपाख्य बलुकाका पेंडसे या दोघांचा अभिष्टचिंतन सोहळा मो. ह. विद्यालयाच्या…
‘प्रो गोविंदा सीझन २’
विजेते सातारा सिंघमला २५ लाख रुपयांचा धनादेश व ट्रॉफी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान अनिल ठाणेकर ठाणे : प्रो गोविंदा सीझन २ च्या चषकावर सातारा सिंघमने (जय जवान गोविंदा पथकाने) आपल्या विजयाची मोहोर उमटवली. विजेत्या संघाला २५ लाख रुपयांचा धनादेश व ट्रॉफी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. सलग दुसऱ्यांदा सातारा सिंघमने (जय जवान गोविंदा पथक) प्रो गोविंदा सीझन २ च्या चषकावर आपले नाव कोरले आहे. प्रो गोविंदा सीझन २ च्या स्पर्धेत द्वितीय पारितोषिक कोल्हापूर कींग्ज (बालवीर गोविंदा पथक), तृतीय पारितोषिक लातूर लेजंट्स (यश गोविंदा पथक), चौथे पारितोषिक अलिबाग नाईट्स (श्री आग्रेश्वर गोविंदा पथक) संघाला घोषित करण्यात आले. यांना अनुक्रमे १५ लाख रुपये, १० लाख रुपये, ५ लाख रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उर्वरित संघांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. प्रो गोविंदा सीझन २ मध्ये सहभागी झालेल्या सर्व गोविंदा पथकांचे मनापासून अभिनंदन करतो. मराठी मातीतला खेळ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचतोय याचा मला अभिमान आहे. यामागे माझे सहकारी आमदार प्रताप सरनाईक व प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांचे फार मोठे श्रेय आहे. हे दोघेही प्रो गोविंदाचे पाईक आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दहीहंडी खेळाला व्यापक स्वरुप दिले. त्यांची परंपरा आम्ही पुढे नेत आहोत. सातारा सिंघम जेव्हा थरावर चढत होते तेव्हा तानाजी मालुसरे चढत आहेत की काय असं वाटतं होते, अशा भावना मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केल्या. स्टार स्पोर्टस् वाहिनीने प्रो गोविंदा सीझन २ चे प्रक्षेपण दाखवल्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आभार मानले. प्रो गोविंदा खेळाची व्यापकता वाढवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. गोपाळकाल्याला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ७५ हजार गोविंदांचे विमा काढण्यात आले आहे. गोविंदा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करा, मात्र हा गोविंदा अपघात मुक्त करा असे आवाहन मुख्यमंत्री महोदयांनी केले. तसेच स्पेनलाही आपले गोविंदा पथक सलामी देण्यासाठी जाणार आहे यासाठी दहीहंडी समन्वय समिती खूप मेहनत घेत आहे असे ते म्हणाले. प्रो गोविंदा सीझन २ च्या अंतिम सामान्यात सोळा संघ सहभागी झाले होते. प्रत्येक गोविंदा पथकांनी उत्कृष्टपणे आपले कौशल्य दाखवत उपस्थितांची मनं जिंकली. ३३.६९ मिनिटात थर रचत सातारा सिंघमने बाजी मारली. आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, मी पाहिलेले स्वप्न पुर्वेश सरनाईक व त्यांच्या टीमने सत्यात उतरवले. गोविंदा हा खेळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता तो राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जायचा आहे. मुंबई-ठाण्यासह राज्यभरातील गोविंदांना प्रो गोविंदाच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ मिळाले. मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी या खेळास गती देण्याचे काम केले. राज्य शासनाने गोविंदा या खेळाचा क्रीडा प्रकारात समावेश केला. राज्य शासनाच्या पाठिंब्यामुळे आज हा खेळ एवढ्या मोठ्या व्यासपीठावर होतोय याचा आनंद आहे. भविष्यात गोविंदा या खेळाला नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळेल असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. गोविंदा हा खेळ मातीपासून ते मॅटपर्यंत आम्ही पोहोचवला आहे. मैदानात खेळला जाणारा खेळ आज इनडोअर स्टेडिअममध्ये खेळला जात आहे. मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब पुढाकाराने व राज्य शासनाच्या पाठिंब्याने प्रो गोविंदा हे व्यासपीठ तयार करण्यात आले. या व्यासपीठाच्या माध्यमातून गोविंदा खेळ देशभरात पोहचला आहे. भविष्यात हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यास आम्हाला नक्की यश मिळेल, असा विश्वास प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केला.प्रो गोविंदा सीझन २ अंतिम सामान्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, सिद्धेश कदम, मुंबई टी २० लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक, नगरसेविका परिषा सरनाईक, डोम सिनेयुग कंपनीचे संचालक अध्यक्ष मोहम्मद मोरानी, डोम एन्टरटेन्मेंटचे व्यवस्थापकीय संचालक मजहर नाडियादवाला यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मुंबई विद्यापीठाचा ५७ वा आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव
आनंद विश्व गुरुकुल जेष्ठ रात्र महाविद्यालय येथे झाला साजरा ठाणे : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने आयोजित केलेल्या ५७ व्या अंतर्विदागी युवक महोत्सवाचा चौथा ठाणे मध्यवर्ती क्षेत्र साहित्यिक आणि ललित कला स्पर्धा शारदा एज्युकेशन सोसायटी, आनंद विश्व गुरुकुल जेष्ठ रात्र महाविद्यालय येथे डॉ. सुनील पाटिल, निर्देशक, विद्यार्थी विकास विभाग, (मुंबई विद्यापीठ) यांच्या अध्यक्षतेख़ाली दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न झाला. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समन्वयक डॉ. रुपेश ध्रुवंशी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या स्पर्धेत ४० हून अधिक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या दिवसभर चाललेल्या स्पर्धेत ६ साहित्यिक आणि ७ ललित कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन शारदा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, संस्थेच्या विश्वस्त व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते, विभागीय समन्वयक डॉ. अर्चना प्रभुदेसाई, विभागीय सह-समन्वयक आकाश कांबळे आणि मुख्य अतिथी प्रा. मंदार टिल्लू यांच्या शुभहस्ते झाले. संस्थेच्या सर्व विभागांचे प्राचार्य शिक्षक समन्वयक प्रा. विनायक जोशी, प्रा. सचिन आंबेगावकर इतर प्राध्यापक वर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचा सूत्रधार प्रा. भक्ती पावसकर यांनी युवक महोत्सवाचे महत्त्व विशद करत त्याचे कलाकार निर्माण करण्यातील योगदानाचा उल्लेख केला. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्य अतिथी प्रा. मंदार टील्लू यांनी विद्यार्थ्यांना विजयापेक्षा सहभागाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाला विद्यार्थी विकास विभागाचे सांस्कृतिक संयोजक निलेश सावे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या कलात्मक कामगिरीचे कौतुक केले. कार्यक्रमाचा शेवटी झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. रुपेश ध्रुवंशी यांनी २८ विजेत्या विद्यार्थ्यांना विभागीय फेरीत पात्र ठरल्याचे पत्र देऊन पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या. शारदा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी विजेत्यांना अभिनंदन करत सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
२ लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा उद्या राज्यव्यापी लाक्षणिक संप
अनिल ठाणेकर ठाणे : २१ ऑगस्टला एक दिवसाचा राज्यव्यापी लाक्षणिक संप करून २ लाख अंगणवाडी कर्मचारी भगिनी मोठ्या संख्येने आझाद मैदानावर जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी…
चार गावांचा सनद वाटपाचा कार्यक्रम संपन्न-नितीन आटाळे
अशोक गायकवाड कर्जत : कर्जत तालुक्यातील चार गावांच्या सनदा नव्याने भारतीय सर्वेक्षण विभागाकडून प्राप्त झाल्या असुन चार गावांच्या सनद वाटपाचा कार्यक्रम १५ ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न झाला, मौजे मानकिवली ता. कर्जत १००% सनद फी वसूल झाली. अशी माहिती उप अधीक्षक भूमि अभिलेख नितीन आटाळे यांनी दिली आहे. सनदांची प्रिंट करून सनदा वाटप विषयाची माहिती कार्यालयाच्या ग्रुपवर त्याच दिवशी पाठविण्याची होती व सनद फी वसुल केलेली रक्कम मुख्यालय सहाय्यक यांच्याकडे जमा करायची होती. या कामास टाळाटाळ होता कामा नये. टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतां विरुध्द नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल अशी सूचना देण्यात आली होती. संबंधीत गावचे ग्रामसेवक यांनी आपण सनद वाटप करण्यासाठी येणार असल्याची माहिती गावकऱ्यांना दिली होती. त्या अनुषंगाने बोरगाव येथे १५ ऑगस्ट २०२४ रोजी संजय गायकवाड भूकरमापक व निलेश जाधवर प्रतिलिपीक, माणकिवली येथे अण्णासाहेब सोमवंशी भूकरमापक व अभिजित मुजमुले अभिलेखापाल, कळंबोली तर्फे वरेडी येथे रामचंद्र कवटे निमतानदार व कृष्णा गायकवाड भूकरमापक, नसरापुर येथे कृष्णा गायकवाड भूकरमापक व सचिन थोरात भूकरमापक हे अधिकारी- कर्मचारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते, असे उप अधीक्षक भूमि अभिलेख, शिरस्तेदार शैलेश जाधव यांनी कळविले आहे.
राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर
मुंबई. … येत्या 20 ते 25 ऑगस्ट या कालावधीत वरिष्ठ पॉवरलिफ्टिंग राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धा -२०२४,कोलकत्ता-पश्चिम बंगाल या ठिकाणीं होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणारा महाराष्ट्राचा संघ खालील प्रमाणे महिला गट – ४७ किलो-काजल भाकरे ठाणे. ,४७ किलो -हर्षदा घोले ,मुंबई उपनगर,…
नागरीकांसाठी किटकजन्य रोग व साथरोगाची विशेष शिबीरांचे आयोजन
नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रा मध्ये हिवताप / डेंगी, जलजन्यथ व साथरोग आजारांबाबत जनजागृती होणे करीता जाहिर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. सदर शिबिरांकरीता नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.…
नवी मुंबईत ‘थर’ या मराठी चित्रपटाचे गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन
नवी मुंबई : तरुणांनी दहीहंडी खेळताना आठ थराच्या वरती थरावर थर रचा, परंतु अपघात होणार नाही, याची दहीहंडी मंडळांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सुरक्षितपणे खेळ खेळावा आणि सणांचा आनंद घ्यावा. दहीहंडी…
