Month: August 2024

सुदर्शन दीपक चव्हाण याचा विशेष सन्मान

ठाणे,  येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दिपक चव्हाण यांचे सुपुत्र व सुलोचना देवी सिंघानिया स्कूलचा विद्यार्थी सुदर्शन दिपक चव्हाण हा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत राज्यात सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.…

२०४७ पर्यंत विकसित भारत देशाची ओळख होईल.- राज्यपाल राधाकृष्णन

अशोक गायकवाड रायगड : भारतामध्ये सेवा क्षेत्रातील नेतृत्वासोबतच जागतिक उत्पादन केंद्र बनण्याची क्षमता आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत ही आपली ओळख असणार आहे. या काळात तरुणांना मोठया प्रमाणावर संधी निर्माण होणार आहे. प्रत्येक युवकाने आपले ध्येय निश्चित करावे. कठोर आणि प्रामाणिक मेहनत आणि सर्वोत्तम सातत्यपूर्ण कामगिरी ही यशस्वी होण्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.* डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे च्या २६ व्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर, अध्यक्ष राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, उपमुख्य कार्यकारी डॉ.भरत बास्टेवाट, विद्यापीठ कुलगुरू डॉ.कारभारी काळे, कुलसचिव डॉ.अरविंद किवळेकर, परीक्षा नियंत्रक डॉ.नरेंद जाधव आदी उपस्थित होते. राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, नव्या पिढीने तंत्रज्ञान, संशोधन, विचार आणि अर्थ अंमलबजावणी यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आज कुशल मनुष्यबळासाठी संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे. युवकांना कौशल्याचे आणि नवनिर्मितीचे प्रशिक्षण देवूनच देशाला या संधीचा लाभ घेता येईल. भारताची झपाट्याने होणारी वाढ, लोकसंख्या शास्त्रीय लाभांश आणि जागतिक स्तरावर वाढते महत्त्व यामुळे आजच्या पदवीधरांसाठी अकल्पनीय संधी निर्माण झाल्या आहेत.आपण आपले ध्येय निश्चित करून आपल्या ध्येयप्राप्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे विद्यार्थी-केंद्रित धोरण तयार केले आहे. याचा फायदा निश्चित होणार आहे. यामुळे शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल होईल.. तसेच हे नवीन विचार आणि नवीन उर्जा निर्माण करेल आणि बेरोजगारीच्या समस्येचे निराकरण करेल आणि उद्योजक पर्यावरण प्रणाली तयार करण्यासाठी सहाय्यक होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आपल्या भारताची संस्कृती जिवंत राहिली व तिचे जतन झाले आहे त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशवासीयांना संविधान मिळाले आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रबोधन करून त्यांना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून देशाचे नाव मोठे करणे व अर्थव्यवस्था सुदृढ करण्याबाबत आवाहन केले. पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर म्हणाले, एखा‌द्याचा ‘जीवनाचा उद्देश साध्य करण्यासाठी आणि राष्ट्रीय विकासासाठी आत्मसात केलेल्या कौशल्यांचा आणि ज्ञानाच वापरआपल्या दैनंदिन आयुष्यात करावा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे राजदूत या नात्याने संपूर्ण राष्ट्रासाठी भरीव योगदान द्यावे असे सांगितले. उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत म्हणाले आपल्याला देशाला बलशाली बनवायचे आहे. यासाठी प्रत्येक युवकांने आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा. आपले सामाजिक भान आणि दायित्व कायम लक्षात ठेवावे असे सांगितले. विद्यापीठाच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विद्यापीठाच्या सक्षमीकरणासाठी शासनाकडून सेवा सुविधा देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे सांगितले. राज्यपाल महोदय व मंत्री महोदयांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्र विद्यापीठातील सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव तसेच विद्यावाचस्पती पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्य गीताने करण्यात आली. या कार्यक्रमाला विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठातील विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.

कान्होजी आंग्रे यांच्या जयंतीनिमित्त श्रीनिवास मुडगेरिकर यांनी केले अभिवादन

अशोक गायकवाड अलिबाग :१८ ऑगस्टला सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या जयंती उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आरसीएफच्या कुरुळ वसाहतीच्या प्रवेशद्वारा जवळ असलेल्या सरखेलांच्या पुतळ्यास आरसीएफचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास मुडगेरिकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच आरसीएफच्या वित्त संचालक श्रीमती नझहत शेख, कार्यकारी संचालक अनिरुद्ध खाडिलकर, मुख्य महा व्यवस्थापक नितीन हिरडे, महा व्यवस्थापक सर्वश्री संजीव हरळीकर, सुधीर कोळी, अभय काळबांडे, व्ही. मगेश, सिआयएसएफचे डेप्युटी कमांडंट संदीप चक्रवर्ती, उप महा व्यवस्थापक विनायक पाटील, अधिकारी- कर्मचारी संघटना प्रतिनिधींनी सरखेलांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. यावेळी शिवप्रेमी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

कातकरी समाजाच्या कुटुंबाना हक्काची मिळणार घरे

पालकमंत्र्यांनी स्वतःची जमीन देऊन सोडविला प्रश्न राज भंडारी   पनवेल :जिल्ह्यातील कातकरी समाजाचा ७० भटक्या कुटुंबाच्या घरांसाठी जागेची समस्या होती. वर्षानुवर्षे त्यांच्या घरांचा प्रश्न प्रलंबित होता. सरकारकडे या समाजातील कुटुंबाना देण्यासाठी जमीन उपलब्ध नव्हती. जेव्हा ही समस्या सिंधुदुर्गनगरी येथील जनता दरबारात मांडण्यात आली त्यावेळी ही समस्या ताबडतोब सोडविण्यात आली. यासाठी आपण स्वतःची ओसरगांव येथील जागा देण्याचा निर्णय घेतला आणि जागा सुद्धा निश्चित करण्यात आली आहे. यामुळे या कातकारी बांधवांना लवकरच हक्काची घरे उपलब्ध होतील, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. जनता दरबारात ८२ अर्ज दाखल झाले होते. पैकी ७४ अर्जाचे निरसन झाल्याचे त्यांनी सांगितले. स्वतःची जमीन देण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे या सर्व कुटुंबांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मनापासून आभार मानले आणि असा नेता किंवा मंत्री आम्ही कधीच पाहिला नाही. वर्षानुवर्षे आम्ही भटकत होतो पण आता आम्हाला हक्काचा निवारा मिळाला आणि आता आमच्या सर्व पिढ्या हक्काच्या घरात राहतील त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे , अशी भावना सर्वांनी व्यक्त केली. सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जनता दरबार झाला. या कार्यक्रमात मंत्री रवींद्र चव्हाण बोलत होते. या प्रसंगी रवींद्र चव्हाण यांच्या सोबत भाजप आमदर नीतेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छींद्र सुकटे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावळे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आ. अजित गोगट आदींसह खाते प्रमुख तसेच कणकवली विधानसभा मतदारसंघातील सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते. जनता दरबार हा प्रसिद्धीसाठी नाही. या पूर्वी सुद्धा जिल्ह्यात असे जनता दरबार होत होते. आज झालेल्या जनता दरबारात ८२ अर्ज दाखल झाले होते. पैकी ७४ अर्जाचे निरसन झाले आहे. सर्वसामान्यांचे तक्रारीचे निरसन होणे हेच खरे या जनता दरबाराचे यश आहे, असे प्रत्युत्तर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आमदर वैभव नाईक यांच्या टीकेला दिले. आमदर नाईक यांनी पालकमंत्र्याचा जनता दरबार हा निवडणुकांसाठी फार्स असल्याची टीका केली होती. सार्वजनिक बांधकाम हायवे आणि पाटबंधारे विभागातील सर्व ९ अर्जाचे निरसन केले असून पोलीस प्रशासनाचे दोन्ही अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. ग्रामविकास विभागाअंतर्गत सर्व १६ अर्जाची पूर्तता झाली असून कृषी व आरोग्य विभाग ५, मध्यम पाटबंधारे आणि नियोजन विभाग ३, समाज कल्याण विभाग २, नगर विकास खारभूमी विभाग ६ असे विभागनिहाय अर्ज निकाली काढल्याचे मंत्री चव्हाण म्हणाले. उर्वरित अर्जावर लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९ हजार ८५९ युवक – युवतींना रोजगार देण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत १ हजार उमेदवारांना विविध विभागात रोजगार देण्यात आला आहे. उर्वरीत उमेदवारांना रोजगार देण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाकडील रोजगार विषयक उपक्रमांची माहिती द्यावी, असे निर्देश ना. चव्हाण यांनी दिले. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत गाव पातळीवर घराघरात पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचविण्यात येत आहे. जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे सुरू आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत जिल्हयात आतापर्यंत १ लाख ५० हजार ३८३ अर्ज प्राप्त झाले असून त्यातील १ लाख ४४ हजार ८७४ अर्ज पात्र ठरले आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेनुसार सोमवारी कणकवली मतदारसंघातील कणकवली, देवगड व वैभववाडी या तालुक्यातील नागरिकांसाठी सिंधुदुर्गनगरी येथे जनता दरबार झाला. तसेच मंगळवारी कुडाळ – मालवण मतदारसंघातील नागरिकांसाठी आणि बुधवारी सावंतवाडी मतदारसंघातील सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यातील नागरिकांसाठी याच ठिकाणी जनता दरबार संपन्न झाला. या सर्व जनता दरबाराला मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळाला.

 मुंबईत ‘रेलनीर’चा पुरवठा बंद

अंबरनाथच्या ग्रामस्थांचे आयआरसीटीसी, ठेकेदाराविरोधात आंदोलन मुंबई : अंबरनाथ येथे आयआरसीटीसीद्वारे ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याचा पुरवठा मध्य आणि पश्चिम रेल्वेवर केला जातो. मात्र, अंबरनाथ येथील काकोळे ग्रामस्थांकडून आयआरसीटीसी आणि परप्रांतीय ठेकेदाराविरोधात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे रेलनीर बाटलीबंद पाण्याची पुरवठा व्यवस्था खंडित झाली आहे. आयआरसीटीसीने मुंबईतील रेल्वे स्थानकांतील रेलनीरचा पुरवठा पुढील सूचनेपर्यंत बंद केला आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)द्वारे ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याचा पुरवठा मध्य, पश्चिम रेल्वे स्थानकात आणि मेल-एक्स्प्रेसमध्ये केला जातो.अंबरनाथ येथील ‘रेलनीर’च्या कारखान्यातून बाटलीबंद पाणी पोहोचवण्याचे काम मालवाहतुकीद्वारे काकोळे ग्रामस्थ करत होते. मात्र, मेपासून वाहतूक ठेकेदार मनोज खाद्यायान भांडार मुझ्झफरपूर याने मालवाहतुकीचा कारभार हाती घेतला. त्यामुळे १२ मालवाहतूकदार ग्रामस्थांची सेवा बंद झाली. तर, वाहतूक ठेकेदार भांडार यांनी ही सेवा मिलेनियम ग्रुप ऑफ कंपनीकडे दिली. परिणामी, काकोळे ग्रामस्थ आर्थिक कोंडीत सापडले आहेत. याबाबत आयआरसीटीसी, रेलनीर, वाहतूक ठेकेदार यांच्या विरोधात ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कसारा/कर्जत, पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरारपर्यंत सर्व रेल्वे स्थानकात, हार्बर मार्गावरील सर्व रेल्वे स्थानके, वापी आणि वलसाड स्थानकात ‘रेलनीर’चा बाटलीबंद पाण्याचा पुरवठा बंद राहणार आहे. रेल्वे स्थानकात प्रवाशांनी पाण्यापासून वंचित राहू नये, यासाठी रेल्वेच्या प्रत्येक स्टॉलवर रेल्वेने नियुक्त केलेल्या खासगी कंपन्यांच्या बाटल्यांची विक्री केली जाईल. चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नवीन वाहतूक ठेकेदार नेमला. मात्र, मालवाहतुकीचे काम पुन्हा काकोळे ग्रामस्थांना मिळावे यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि नवीन वाहतूक ठेकेदार यांच्या बाजू ऐकून मध्यम मार्ग काढला जाईल. मालवाहतूक खंडित झाल्याने पुढील दोन दिवस मुंबईतील रेल्वे स्थानकात ह्यह्णरेलनीरह्णह्ण बाटलीबंद पाण्याचा पुरवठा बंद राहील, असे आयआरसीटीसीकडून सांगण्यात आले. मेपासून काकोळे गावातील १२ मालवाहतूकदारांना कोणतीही पूर्वसूचना न देता, त्यांची सेवा खंडित केली. त्यामुळे ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे. – नरेश गायकर, उपसरपंच, काकोळे गाव, अंबरनाथ 00000

 म्हाडाची सोडतपूर्व प्रक्रिया समजून घेण्याची संधी

 माहितीसाठी उद्या ऑनलाइन कार्यशाळा   मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून २०३० घरांच्या सोडतीसाठी अर्जविक्री आणि अर्ज स्वीकृती प्रक्रिया सध्या सुरू आहे. या सोडतपूर्व प्रक्रियेदरम्यान अर्ज भरताना, अर्ज दाखल करताना इच्छुक अर्जदारांना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. ही बाब लक्षात घेत इच्छुक अर्जदारांना मार्गदर्शन करण्यासाठी, अर्ज कसा भरावा, काही अडथळे असल्यास ते कसे दूर करावेत या संदर्भातील इत्यंभूत माहिती देण्यासाठी मुंबई मंडळाने एक ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केली आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता ही कार्यशाळा होणार आहे. मुंबईतील गोरेगाव, बोरिवली, मालाड, जुहू, पवई, ताडदेव, दादर, वरळी, विक्रोळी इत्यादी परिसरातील २०३० घरांसाठी १३ सप्टेंबरला सोडत काढली जाणार आहे. अत्यल्प, अल्प मध्यम आणि उच्च अशा सर्व गटातील घरे या सोडतीत समाविष्ट आहेत. तर २४ लाख ते साडेसात कोटी अशा या घरांच्या किमती आहेत. या सोडतीसाठीच्या अर्जविक्री आणि अर्जस्वीकृती प्रक्रियेला ९ ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आली आहे. या प्रक्रियेस सुरुवात होऊन दहा दिवस उलटले तरी अर्जविक्री – स्वीकृतीस अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. महागडी घरे आणि अर्ज करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी यामुळे अर्जांची संख्या कमी आहेत. शुक्रवारी,१६ ऑगस्ट पर्यंत ५४०३ अर्ज भरले गेले होते. तर अनामात रकमेसह त्यातील केवळ ३२४२ जणांनी अर्ज सादर केले आहेत. हा प्रतिसाद अत्यंत कमी मानला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई मंडळाच्या पणन विभागाने आणि म्हाडा प्राधिकरणाच्या माहिती संचार आणि तंत्रज्ञान विभागाने अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी आणि इतर अडचणी दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता ही ऑनलाइन कार्यशाळा होणार आहे. यात मुंबई मंडळाच्या पणन विभागाचे उप मुख्य अधिकारी राजेंद्र गायकवाड आणि अन्य अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. अर्जदारांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न यावेळी केला जाणार आहे. अर्ज कसा भरावा, तो कसा सादर करावा याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवले जाणार आहे. सोडतीसाठी ज्या अर्जदारांनी नोंदणी केली आहे, तसेच नोंदणी करण्यास इच्छुक आहेत अशांना https://youtube.com/live/asSycqY6Dvc?feature=share या लिंकवर जात या कार्यशाळेत सहभागी होता येणार आहे. सोडतीसाठी नोंदणी केलेल्या अर्जदारांना एसएमएसद्वारे आणि म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळावरही कार्यशाळेची लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. म्हाडाचे अधिकृत यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज @mhadaofficial वरही या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तेव्हा या कार्यशाळेत अधिकाधिक अर्जदारांनी, इच्छुक अर्जदारांनी सहभागी होत आपल्या शंकांचे निरसन करावे असे आवाहन मुंबई मंडळाकडून करण्यात आले आहे. दरम्यान म्हाडा सोडतीच्या पार्श्वभूमीवर दलाल सक्रिय झाले आहेत. सोडतीत घर मिळवून देण्याच्या नावे सर्वसामान्यांची फसवणूक केली जाण्याची शक्यता आहे. बनावट संकेतस्थळामुळेही काहीजणांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक बाबी उघड झाली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता मुंबई मंडळाने म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज नोंदणी अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकृती प्रक्रिया पार पाडावी असे आवाहन केले आहे. कोणत्याही आमिषाला, भूलथापांना बळी पडू नये, असेही आवाहन केले आहे. 00000

पनवेलच्या तरुणांचे माथेरान मध्ये स्वच्छता अभियान

माथेरान : लक्ष शूटिंग क्लब पनवेल या संस्थेमार्फत १५ ऑगस्टला माथेरानमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील सनसेट पॉईंट या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले माथेरानमध्ये दरवर्षी अशा प्रकारच्या अभियान ही…

 ठाणेकरांच्या वेगवान प्रवासाचे स्वप्न अंतर्गत मेट्रो प्रकल्पामुळे पूर्ण होणार

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्याकडून आभार   ठाणे : ठाणे शहरातील २५ लाखांहून अधिक नागरिकांचे वेगवान प्रवासाचे स्वप्न अंतर्गत मेट्रो प्रकल्पामुळे पूर्ण होणार आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही धन्यवाद दिले आहे. ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पात नवीन ठाणे, रायलादेवी, वागळे चौक, लोकमान्य नगर बस डेपो, शिवाईनगर, निळकंठ टर्मिनल, गांधीनगर, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, वाघबीळ, वॉटरफ्रंट, पातलीपाडा, आझादनगर बस स्टॉप, मनोरमानगर, कोलशेत औद्योगिक क्षेत्र, बाळकुम नाका, बाळकुम पाडा, राबोडी, शिवाजी चौक, ठाणे जंक्शन आदी स्थानके असतील. या मेट्रोचा वेग ताशी ८० किलोमीटर असल्यामुळे ठाण्यातील रहिवाशांना एका भागातून दुसऱ्या टोकाला वेगाने जाता येईल. येत्या २०२९ पर्यंत मार्ग पूर्ण झाल्यानंतर या मेट्रोमुळे दर तासी १५ हजार प्रवाशांची वाहतूक होईल. त्यामुळे नागरिकांना वाहतूककोंडीत अडकावे लागणार नाहीत, अशी प्रतिक्रिया संजय वाघुले यांनी व्यक्त केली. ठाणे अंतर्गत मेट्रोच्या एका कार युनीटमध्ये प्रती चौरस मीटर प्रवाशांची क्षमता ६ ते ८ आहे. उन्नत व भूमिगत स्थानकांच्या मेट्रो मार्गामुळे ठाण्याच्या विकासाला आणखी वेग येईल. तसेच ठाणे शहराची देशातील विकसित शहरांमध्ये नोंद होईल, अशी आशा भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मेट्रो प्रकल्पाची किंमत १२ हजार २०० कोटी रुपये असून, पुढील पाच वर्षात प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. चौकट अशी धावणार अंतर्गत मेट्रो (भूमिगत व उन्नत मार्ग) : नवीन ठाणे (भूमिगत), रायलादेवी, वागळे चौक, लोकमान्य नगर बस डेपो, शिवाईनगर, निळकंठ टर्मिनल, गांधीनगर, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, वाघबीळ (भविष्यामध्ये प्रस्तावित), वॉटरफ्रंट, पातलीपाडा (भविष्यामध्ये प्रस्तावित),आझादनगर बस स्टॉप, मनोरमानगर, कोलशेत औद्योगिक क्षेत्र (भविष्यामध्ये प्रस्तावित),बाळकुम नाका, बाळकुम पाडा (भविष्यामध्ये प्रस्तावित), राबोडी, शिवाजी चौक, ठाणे जंक्शन

कोलकात्यातील निर्घुण हत्येबद्दल कोपरीकरांनी व्यक्त केला संताप

ठाणे : कोलकात्यातील महिला डॉक्टरची अत्याचारानंतर हत्या केल्याच्या घटनेबद्दल कोपरीकरांनी तीव्र संताप व्यक्त केला. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कोपरीत निषेध…

 बोरीवली पूर्व येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 पाच तासात पावणे दोनशे लोकांनी केले रक्तदान   मुंबई : बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री भरत रामचंद्र घाणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भरत घाणेकर मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मागाठाणे जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या समोरील भागात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात पाच तासात सुमारे पावणे दोनशे लोकांनी रक्तदान केले. सुमारे एकशे चोपन्न बाटल्या रक्त जमा झाले. बोरीवली रक्तपेढी तर्फे हे रक्तसंकलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार गोपाळ शेट्टी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय वैद्य, योगेश वसंत त्रिवेदी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री श्याम कदम आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वरुण घाणेकर  कार्यक्रमास लक्ष्मीकांत नाईक, रमेश घाणेकर, संदेश कोलापटे, संजय घाडगे, सिद्धेश्वर वाघचौरे, नरेंद्र माली, अशोक पडीयार, हरिश्चंद्र कत्वांकर, बिपिन सावंत यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गायत्री नाईक, हृदया घाणेकर, रोहित गुप्ता, ओमकार कणसे, गीत घाणेकर, निशांत पेडणेकर, राहुल वाडीकर, पार्थ नगवदरिया  आदींनी परिश्रम घेतले. 00000