Month: August 2024

 देशभक्तीपर गाण्यांच्या सूरावटींनी निनादले महापालिका मुख्यालय

‘घरोघरी तिरंगा’ अभियानात झाला विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम   ठाणे : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७८ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने काल ठाणे महानगरपालिका मुख्यालयात देशभक्तीपर गीते, नृत्य आदी विविध सांस्कृतिक…

सुरेश आचरेकर स्मृती चषकाची अनाहिता महाजन मानकरी

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित बीओबी कप विविध ८ वयोगटातील बुध्दिबळ स्पर्धेमध्ये अनाहिता महाजनने ६ वर्षाखालील गटात सर्व सामने जिंकले आणि समाजरत्न स्व. सुरेश आचरेकर स्मृती चषक…

रामशेठ ठाकूर यांच्याकडून निष्ठा वाघमारेला उच्च शिक्षणासाठी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत

अशोक गायकवाड   पनवेल : परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी नवीन पनवेल येथील निष्ठा जितेंद्र वाघमारे या विद्यार्थिनीला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या रामशेठ…

‘‘घरोघरी तिरंगा” अभियान मॅरेथॉन जनजागृती स्पर्धा रॅलीला

किशन जावळे यांनी दाखविला हिरवा झेंडा     रायगड : अलिबाग जिल्हा प्रशासनच्यावतीने जिल्ह्यात उद्भवणाऱ्या विविध आपत्ती संदर्भात जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथून मॅरेथॉन जनजागृती स्पर्धा रॅलीला जिल्हाधिकारी किशन…

अटल सेतूतील जोडरस्त्यावरील तडे प्रकरण

अखेर कंत्राटदाराला एक कोटी रुपये दंड     मुंबई : अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतूच्या (अटल सेतू) जोडरस्त्यावर तडे पडल्याचे जूनमध्ये निदर्शनास आले होते. ही बाब निदर्शनास येताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तात्काळ जोडरस्त्याची दुरुस्ती केली. मात्र या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराविरोधात कोणतीही कारवाई झाली नव्हती. आता कंत्राटदारावर कारवाई करून एक कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. नवी मुंबई आणि मुंबईतील अंतर १५ मिनिटांत पार करता यावे यासाठी एमएमआरडीएने १८ हजार कोटी रुपये खर्च करून २२ किमी लांबीचा अटल सेतू बांधला. या अटल सेतूचे लोकार्पण जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र अटल सेतूवरून उलवे येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जोडरस्त्यावर तडे पडल्याची बाब निदर्शनास आली होती. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी जूनमध्ये ही बाब प्रसारमाध्यमांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर यावरून एमएमआरडीए आणि एकूणच कामाच्या दर्जावर टीका झाली होती. दरम्यान, तडे पडल्याचे वृत्त पसरताच एमएमआरडीएने तात्काळ जोरस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आणि काही तासातच ते पूर्ण केले. अटल सेतूला कुठेही धोका नाही, २२ किमी लांबीच्या सेतूवर तडे पडलेले नाहीत, सेतूला जोडलेल्या जोडरस्त्यावर तडे पडल्याचे स्पष्टीकरण यावेळी एमएमआरडीएकडून देण्यात आले होते. एमएमआरडीएने रस्त्याची दुरूस्ती करून घेतली. मात्र कंत्राटदाराविरोधात केलेल्या कारवाईची माहिती उपलब्ध झाली नव्हती. आता मात्र संबंधित कंत्राटदाराविरोधात एमएमआरडीएने दंडात्मक कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकाराखाली उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जोडरस्त्यावरील तडेप्रकरणी कंत्राटदार कंपनी स्ट्रॉबॅगवर त्याचवेळी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती. सदर रस्त्याचे ५ जानेवारीला काम पूर्ण करण्यात आले असून कामाची गुणवत्ता राखली नसल्याचे या नोटीसमध्ये नमुद करण्यात आले होते. त्यानंतर अटल सेतूचे सल्लागार के. आर. शिवानंद यांनी कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई संबंधी नोटीस बजावली. तसेच एक कोटी रुपये दंड ठोठावला. तसेच आवश्यक ती सर्व दुरूस्ती करण्याचेही निर्देश या नोटीसमध्ये कंत्राटदाराला देण्यात आले होते. दरम्यान, अटल सेतू महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून दर सहा महिन्यांनी अटल सेतूचे आवश्यक ते परीक्षण करण्याची मागणी गलगली यांनी केली आहे. त्याचबरोबर संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

अवयवदान चळवळ इतकी फोफावली पाहिजे की भारतातून नेत्रांची निर्यात होऊ शकेल

प्रा. नयना रेगे यांनी व्यक्त केला निर्धार     मुंबई  : आजच्या तारखेला श्रीलंकेसारखा आपल्यापेक्षा कितीतरी लहान असलेला देश भारतासारख्या महासत्तेकडे झेपावणाऱ्या देशाला नेत्रांची निर्यात करतो. आपल्या देशात अवयवदानाचे महत्त्व सर्वांना पटवून देत ही चळवळ इतक्या जोमाने फोफावली पाहिजे की भविष्यात भारतातून नेत्रांची निर्यात करता आली पाहिजे, अशी ‘नेत्र’दीपक कामगिरी करण्याचा निर्धार या चळवळीतील क्रीयाशील कार्यकर्त्या प्रा. सौ. नयना रेगे यांनी बोलून दाखविला. जागतिक अवयवदान दिनाच्या निमित्ताने पर्व शैक्षणिक धर्मादाय संस्थेच्या वतीने अवयव दान सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.  या सप्ताहाचा शुभारंभ प्रा. सौ. नयना रेगे यांनी अवयव दानाचे महत्त्व कथन करून करण्यात आला. त्यांनी लोकांचा गैरसमज दूर करणारी काही उदाहरणे सुद्धा सांगितली. या  सप्ताहात महाराष्ट्राच्या विविध भागांत १८ ठिकाणी अवयवदान माहिती प्रचार आणि प्रसार ऑनलाईन केंद्र नागरिकांकरीता खुली होणार आहेत. या अवयव दानाच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ROTTO, SOTTO या महाराष्ट्र राज्याच्या मुख्य समुपदेशक सुजाता अष्टेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. संस्थेचे मुख्य सल्लागार विजय वैद्य आणि विश्वस्त सौ. वैशाली वैद्य, प्रविण वराडकर यांच्या समवेत पर्व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या माध्यमातून महाराष्ट्र व्यापी अवयवदानचळवळ होणार असल्याचे विजय वैद्य आणि प्रवीण वराडकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. 0000

मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांची नोटीस

ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर नारळ फेकण्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना…

 ठाण्यात भरदिवसा हवेत गोळीबार

 बंदूकीचा धाक दाखवून सराफाला लुटण्याचा प्रयत्न ठाणे : ठाण्यातील बाळकूम भागात एका सराफाला बंदूकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु सराफाने प्रतिकार केल्याने चौघेही पळून जात होते. त्यावेळी एका बंदूकधारीने हवेत गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकारानंतर सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. बाळकूम येथील पाडा क्रमांक दोन परिसरात सराफाचे दुकान आहे. बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सराफ दुकानामध्ये एकटा असताना चार जण त्यांच्या दुकानामध्ये शिरले. त्यातील एकाकडे बंदूक होती. चौघांनी बंदूकीचा धाक दाखवून सराफाला मारहाण करत लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचवेळी सराफाने त्याच्याकडील एका दांडक्याने चौघांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर चौघे चोरटे पळून जात होते. सराफाने आरडाओरड केला. स्थानिक रहिवाशांनी चोरट्याचा पाठलाग केला तसेच एकाला पकडले. तर एका चोरट्याने हवेत गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 00000

रायगडच्या जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख पदी सुनील इंदलकर

अशोक गायकवाड     रायगड : जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख रायगड पदाची सूत्रे सुनिल इंदलकर यांनी हाती घेतली आहेत. यावेळी उप अधीक्षक भूमि अभिलेख, कर्जत नितीन आटाळे आणि शिरस्तेदार शैलेश जाधव यांनी इंदलकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 0000

डोंबिवलीतील बेकायदा ‘राधाई’ भुईसपाट करण्यास न्यायालयाची दोन आठवड्यांची मुदत

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंद येथील राधाई बेकायदा इमारत भुईसपाट करण्यास कल्याण डोंबिवली पालिकेला काही तांत्रिक अडथळे येत असल्याने ही इमारत भुईसपाट करण्यास दोन आठवड्याची मुदत वाढवून देण्यास मुंबई…