Month: August 2024

‘आपले सरकार’ केंद्रांचा कारभार व्यवस्थापकाविना

ठाणे : सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी, विविध दाखले तसेच ग्रामपंचायतीची ऑनलाइन कामे तातडीने होण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीत सुरू केलेले ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांचा कारभार गेले दहा दिवस व्यवस्थापकाविना सुरू…

नमुंमपा क्षेत्रात 24 ठिकाणी हिवताप, डेंग्यू प्रतिबंधात्मक शिबीर यशस्वी

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रा मध्ये सद्यस्थितीत पावसाची येजा सुरु असल्याने हिवताप /डेंग्‍यु, जललन्य व साथरोग या आजारांसाठी संवेदनशील आहे.  त्याअनुषंगाने नमुंमपा, आरोग्य विभागमार्फत हिवताप /डेंग्‍यु यासारखे आजाराचा प्रसार रोखणे करीता…

 सेवाव्रती उषा केळकर आणि बलुकाका पेंडसे यांचा गौरव  

न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते रविवारी होणार गौरव       ठाणे : जन्मभूमी पेक्षा कर्मभूमीच श्रेष्ठ मानून ज्यांनी शाळेची जवळपास तीन ते चार दशके निरलसपणे सेवा केली अशा शिक्षण सेवेचे व्रत अंगीकारलेल्या  सेवाव्रती  उषा मुकुंद केळकर (वय 95) आणि गणेश हरी उपाख्य बलुकाका पेंडसे ( वय  91) या दोघांचा अभीष्टचिंतन सोहळा मो.ह. विद्यालयाच्या प्रांगणात 18 ऑगस्ट रोजी दुपारी  ४ वाजता संपन्न होणार आहे. न्यायिक क्षेत्रातील मूल्य जपणारे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक आपल्या गुरुजनांसाठीच या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी पद भूषवणार आहेत. उषाताई केळकर संगीताच्या उत्तम शिक्षिका तर बलूकाका पेंडसे सर शारीरिक शिक्षणाचे लाडके शिक्षक. संपूर्ण शाळा हे एक कुटुंबच आहे असे मानून मो.ह. परिवारातल्या प्रत्येकाला एका प्रेमळ धाग्याने अखंड बांधून ठेवण्याचं अजोड काम या दोहोंनी केले. निवृत्त होऊनही जवळपास तीन दशके लोटली तरीही शाळेबद्दल, संस्थेबद्दलचे त्यांचे प्रेम यत्किंचितही कमी झालेले नाही. शाळेत होणाऱ्या प्रत्येक उपक्रमाला हजर राहून कुटुंब प्रमुखाची भूमिका ते बजावत असतात. आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेचे जणू हे दोघे अक्षय पात्र आहेत. संस्कारांची पाठ राखण करणाऱ्या मो.ह. परिवाराला यांचा अत्यंत अभिमान आणि कौतुक आहे म्हणूनच या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शाळेने दिली आहे. ०००००

भारतातील बंदर व गोदी कामगारांचा  २८ ऑगस्टपासून राष्ट्रव्यापी बेमुदत संप

अनिल ठाणेकर   ठाणे : भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांना  १  जानेवारी २०२२  पासून नवीन वेतन करार लागू आहे. आत्तापर्यंत द्विपक्षीय वेतन समितीच्या ७ मिटिंग झाल्या,  परंतु कोणतीही सन्माननीय तडजोड न झाल्यामुळे नाईलाजाने २८  ऑगस्टपासून किंवा त्यानंतर केव्हाही  बंदर व गोदी कामगार आपल्या मागण्यांसाठी  बेमुदत संपावर जातील, असा स्पष्ट इशारा अखिल भारतीय बंदर व गोदी कामगारांच्या पाचही  मान्यताप्राप्त महासंघाच्या नेत्यांनी केंद्र सरकारला दिला आहे. प्रमुख बंदरातील कामगार संघटनांनी १२ ऑगस्टला पोर्ट  प्रशासनाला संपाची नोटीस दिली आहे. या मिटींगला ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष पी. एम. मोहम्मद हनीफ, जनरल सेक्रेटरी जी. एम. कृष्णमूर्ती, ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशन (वर्कर्स)चे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, खजिनदार विद्याधर राणे, क्लिंटन, वॉटर ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे एस. बालकृष्णन,  इंडियन नॅशनल पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष पी.  काथिरवेल, ए.  बलरामन, पोर्ट, डॉक आणि वॉटर फ्रंट वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष एस. एस. सर्वानान, वाय. एस. प्रकाशराव तसेच  इतर बंदरातील कामगार नेते व्ही. सत्यनारायण, एस. सुरेश, थॉमस सेबॅस्टियन, के. दामोदरन, जे.पी. रोमल्ट, ओ. कनागराज. एस.श्रीनिवास राव, एन.ग्लिंग्टन, जोहन केनडी,  ग्लीनटन  फर्नांडो, मारुती विश्वासराव आदी मान्यवर उपस्थित होते. भारतातील प्रमुख बंदर  व गोदी कामगार महासंघांच्या राष्ट्रीय समन्वय समितीची मिटिंग ७ आणि ८  ऑगस्ट २०२४  रोजी व्हीओसी पोर्ट, तुतीकोरीन येथे  झाली.   या  राष्ट्रीय समन्वय समितीच्या बैठकीत एकमताने  प्रमुख बंदरांच्या सर्व गोदी  कामगार व पेन्शनर्स यांच्या  वेतन आणि भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी बेमुदत राष्ट्रव्यापी संप करण्याचा निर्णय घेण्यात आला. बंदर व गोदी कामगारांच्या मान्यताप्राप्त पाचही महासंघांनी वेतन कराराची मुदत संपण्यापूर्वीच ५ सप्टेंबर २०२१ रोजी संयुक्त मागणी पत्र केंद्र सरकार व इंडियन पोर्ट असोसिएशनला दिले आहे.वेतन कराराची मुदत संपल्यानंतर  जहाजबांधणी मंत्रालयाने गोदी कामगारांच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी २ जून  २०२२ रोजी  द्विपक्षीय वेतन  समितीची (BWNC) स्थापना केली. परंतु  दुर्दैवाने, ३१  महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही  द्विपक्षीय वेतन समिती  महत्त्वाच्या मागण्यांबाबत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकली नाही.  कारण मंत्रालयाने लादलेल्या जाचक अटी आणि बेकायदेशीर मार्गदर्शक तत्त्वे यामुळे मुख्य अडथळा निर्माण झाला आहे.फेडरेशनच्या नेत्यांनी या मार्गदर्शक तत्त्वांना कडाडून विरोध केला असून,  वेतनश्रेणीची पुनर्रचना, फिटमेंट लाभ, विद्यमान लाभांचे संरक्षण, मागील वेतन कराराची  अंमलबजावणी,  महागाई भत्त्याचे मूळ पगारात विलनीकरण  यासह अनेक महत्त्वाच्या मागण्या आहेत. जहाज मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वांनुसार   कामगार व अधिकाऱ्यांच्या वेतनाची तुलना करण्याचा आग्रह धरला आहे.जहाज मंत्रालय द्विपक्ष वेतन समितीमधील व्यवस्थापन प्रतिनिधींवर त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी दबाव आणत असल्याने आणि फेडरेशन या बेकायदेशीर निर्देशाच्या विरोधात असल्यामुळे, चर्चा बंद पडल्या आहेत. बंदर आणि गोदी कामगारांना वेळोवेळी झालेल्या करारानुसार  उत्पादकता निगडीत बक्षीस (पी एल आर ) दिला जातो.  कामगारांना  दरवर्षी सप्टेंबर महिन्यापासून सणासुदीच्या हंगामात बोनस देय असतो. मागील पी. एल . आर. (बोनस) कराराची मुदत २०२०  मध्ये संपली होती.  २०२०-२१  पासून ५  वर्षांच्या कालावधीसाठी PLR देण्यासाठी  नवीन सामंजस्य करार IPA आणि फेडरेशन्ससोबत  १५ जून  २०२३ रोजी केला होता. आजपर्यंत या करारास मंत्रालयाने मान्यता दिली नाही आणि त्यामुळे अद्याप अंतिम बोनस करार  होऊ शकला नाही.  आता, २०२३-२४ कालावधीसाठी PLR देय आहे. मेजर पोर्ट ऑथॉरिटीज ऍक्ट, २०२१   या  सुधारित कायद्यानुसार आता प्रमुख बंदरात कामकाजासाठी आवश्यक माणसे आणि यंत्रसामग्री पुरवण्याच्या स्थितीत नाहीत. नवीन प्राधिकरण मंडळाचे मुख्य कार्य हे बंदरातील कामांचे आऊटसोर्सिंग आणि कामगारांना करार करण्यापुरते मर्यादित आहे.  प्रलंबित वेतन करार, पीएलआर पेमेंट, कायदेशीर कराराची अंमलबजावणी न करणे, अशा पद्धतीने कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण  निर्माण करून ट्रेड युनियनचे अधिकार कमी करणे,  बंदर निधीचा गैरवापर  करणे, यामुळे प्रमुख बंदरातील  कामगारांमध्ये प्रचंड असंतोष  वाढत आहे. त्यामुळे राष्ट्रीय समन्वय समितीला  २८ ऑगस्ट  रोजी   किंवा त्यानंतर देशव्यापी बेमुदत संपावर जाण्याची वेळ आली आहे.    मंत्रालय आणि व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या वरील मागण्यांचा खऱ्या  अर्थाने त्वरित विचार करून बंदरांमध्ये होणारा संप टाळावा. ०००००

मोदींच्या सभा झाल्यास मविआचे सरकारच येणार शरद पवारांचा मोदींना टोला

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवार यांचं काय बोलणं झालं हे मला माहित नाही. पण माझं एकच म्हणणं आहे की, आता विधानसभेची निवडणूक आली आहे. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिक सभा…

महाराष्ट्रातला सर्वसामान्य सत्तेत येणार – जरांगे पाटील

पुणे : महाराष्ट्र सरकारने जर आरक्षण नाही दिले तर सगळ्या जागा आम्ही लढवणार आहोत. आम्ही सगळ्यांना निवडून आणू. हा महाराष्ट्रातला पहिला उठाव असेल. सर्वसामान्य लोकसत्तेत गेले हे ७५ वर्षात पहिल्यांदा घडणार. असा इशारा मनोज जरांगे पाटील…

मीरा भाईंदर महापालिकेविरुद्ध अर्धनग्न आंदोलन

मीरा रोड – मीरा भाईंदर महापालिकेच्या उद्यान विभागातील ठेका कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या मागण्या सातत्याने डावलल्या जात असल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने सोमवारी महापालिके बाहेर उघडे राहून आंदोलन केले . प्रशासनाने १५ दिवसात…

बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनी हिंदू समाजाची मागितली माफी

ढाका :  शेख हसीना यांच्या सरकारविरोधात जनतेनं उठाव केल्यानंतर आता बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूवर अन्वनित अत्याचार होत आहेत. यासाठी बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनी हात जोडून हिंदू समाजाची माफी मागितली आहे. बांगलादेशातील परिस्थिती इतकी…

पैसा काय राणांच्या मालकीचा आहे ?

 लाडक्या बहीनींना धमकी देणाऱ्या राणांवर वडेट्टीवारांचा हल्लाबोल   छत्रपती संभाजीनगर  : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सरकारी पैशातून आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळविण्यासाठी बहिणींना फसविण्यासाठी ही योजना सरकारने आणली आहे. आमदार रवी राणा जे बोलले…