Month: August 2024

३५ सीसीटीव्ही कॅमेरे तपासून दोन दिवसांत सोनसाखळीचा शोध

नवी मुंबई : घणसोली येथील एका ज्येष्ठ नागरिक महिला दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी रिक्षात विसरली. पोलिसांनी ही रिक्षा शोधण्यासाठी तब्बल ३५ सीसीटीव्हींचे चित्रण तपासले आणि रिक्षाचालकाचा माग काढला. दोन…

कडोंमपातील ११८ हेक्टर सरकारी जागेवर अतिक्रमण कल्याणच्या तहसीलदारांची उच्च न्यायालयात माहिती

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील राज्य सरकारच्या मालकीच्या ११८.१८ हेक्टर जागेवर अतिक्रमणे असल्याची माहिती कल्याणच्या तहसीलदारांनी उच्च न्यायालयात दिली आहे. तसेच, ही अतिक्रमणे हटवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याचा…

घोडबंदर घाटात तेल सांडले, ठाणेकर कोंडीत अडकले

ठाणे : घोडबंदर घाटात बुधवारी पहाटे तेल सांडल्याने त्याचा परिणाम सकाळपासून जाणवू लागला आहे. भाईंदर पाडा ते मानपाडा पर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर हैराण झाले आहेत.…

एमआरटीआय'(मार्टी) साठी ११ पदांसह ६.२५ कोटींच्या खर्चास मान्यता – उपमुख्यमंत्री अजित पवार

अल्पसंख्याक योजनांकरिता कर्जावरील शासन हमीची मर्यादा ३० कोटी रुपयांवरून ५०० कोटी रुपयांपर्यंत ! अनिल ठाणेकर     ठाणे :अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी एकूण ११ पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात…

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिकेने उपलब्ध केली नि:शुल्क शाडूची माती

ठाणे, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आयोजन व्हावे यासाठी ठाणे महापालिकेतर्फे मार्च महिन्यापासून विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. याच अंतर्गत महापालिकेने यंदा ठाणे महापालिका क्षेत्रातील ६ मूर्तीकारांना नि:शुल्क शाडूची माती, तसेच, ४…

बेशिस्त रिक्षाचालकांविरोधातील स्वाक्षरी मोहिमेला प्रवाशांचा प्रतिसाद

भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचा पुढाकार     ठाणे : ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांविरोधातील स्वाक्षरी मोहिमेला ठाण्यातील प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या…

विरोधीपक्ष विषाप्रमाणे काम करतोय – आ. संजय केळकर

अशोक गायकवाड   पनवेल : भारतीय जनता पक्ष सत्ता लोकांच्या सेवेसाठी म्हणून बघतो मात्र विरोधक स्वार्थासाठी सत्ता मिळवू पाहत आहे.त्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीपासून विरोधकांनी खूप अपप्रचार केला, आणि विष जसे…

माथेरान मधील रस्त्यांची चाळण !

व्यापारी ,पर्यटक आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त   माथेरान : माथेरान मधील मुख्य रस्ते खड्डेमय झाले असून विविध ठिकाणी लावण्यात आलेले क्ले पेव्हर ब्लॉक पावसाने वाहून गेल्याने रस्त्यांची गटारे झाली आहेत. धुळविरहीत रस्त्याला एकमेव पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी स्थानिकांच्या मागणी नुसार सनियंत्रण समितीने रस्त्यावर क्ले पेव्हर ब्लॉक बसविण्यास परवानगी दिल्याने इथे धुळीचे प्रमाण काहीअंशी का होईना कमी झाले आहे. तर नेहमीच विकासाला विरोध करणाऱ्या राजकीय वरदहस्त असलेल्या मंडळींना मुळातच हे क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते नकोशे वाटतात.एकीकडे याच क्ले ब्लॉकच्या रस्त्याचा वापर सुध्दा करायचा आणि विरोधी भूमिका पण घ्यायची अशा परिस्थितीत गावाचा विकास खुंटत चालला आहे. काही ठिकाणी जुन्या क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे त्यामुळे प्रवास करताना पर्यटकांना,नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.नवीन ब्लॉक लावण्यास सध्यातरी कोर्टाने बंदी घातली आहे त्यामुळे जुने ब्लॉक लावून रस्ते पूर्ववत करावेत नगरपरिषदेच्या माध्यमातून लवकरच ही रस्त्यांची महत्वपूर्ण अत्यावश्यक सुविधा पूर्णत्वास न्यावी जेणेकरून याचा पर्यटनावर विपरीत परिणाम होणार नाही अशी मागणी स्थानिक तसेच व्यापारी वर्गातून केली जात आहे. ——————————————————- हुतात्मा भाई कोतवाल नावाने नगरपरिषदेने शॉपिंग मार्केट बनविले स्टेशन परिसरात गजबजलेल्या परिसरात हे मार्केट असून नगरपरिषदेने प्रथम ह्याच रस्त्याला क्ले पेव्हर ब्लॉकचा पायलट प्रोजेक्ट बनवला होता.  पण आज त्या रोडची अतिशय खराब परिस्थिती झाली आहे ह्या रस्त्यावरूनच महत्वाच्या भागात जाण्यासाठी सततची रहदारी सुरू असते. पण नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करीत आहे कित्येक पर्यटक अपघात होऊन जखमी झाले आहेत. तरीही हा रस्ता अनेक महिन्यांपासून दुरुस्त केला जात नाही ह्या रस्त्याला ज्या हुतात्म्यांचे नाव दिले आहे त्यांच्या नावाची तरी कदर करून हा रस्ता दुरुस्त करण्याची तसदी घ्यावी. प्रदिप घावरे— माजी नगरसेवक 00000

अनधिकृत व्यवसायांवर व बेवारस वाहन पार्कींगवर धडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नेरुळ विभागाअंतर्गत येणारे नेरूळ रेल्वे स्टेशन पश्चिम व पूर्व, सेक्टर-2 नेरूळ राजीव गांधी ब्रिजजवळ, सेक्टर – 1 शिरवणे न्यु मॉर्डन बार जवळ, सेक्टर -15 फकिरा…

‘प्रत्येक सणातून राजकीय वातावरण निर्मिती करा’

मंत्री रवीद्र चव्हाण यांचा कार्यकर्त्यांना सल्ला   उल्हासनगर : विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे येत असलेल्या प्रत्येक सणामध्ये राजकीय वातावरण निर्मिती करा, असे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी उल्हासनगरात पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिले. विधानसभा कार्यकारिणी विस्तारित बैठकीत चव्हाण बोलत होते. विधानसभा निवडणूक अवघ्या अडीच महिन्यांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे भाजप जोमाने कामाला लागला आहे. मोदी सरकारने मागील दहा वर्षांत २५ करोड भारतीयांना गरिबीतून बाहेर काढल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, २०१९ मध्ये आपल्याबरोबर गद्दारी झाली; मात्र आता तसे होणार नाही. त्यामुळे पुढची पाच वर्षे विधानसभेत आपली सत्ता राहणार, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र सरकारने चालू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना आदी योजनांबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँगेस सरकार भ्रष्टाचारी सरकार होते. त्यामुळे ते पुन्हा निवडून आल्यावर योजना बंद करेल, असे रवींद्र चव्हाण म्हणाले. भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी कलानी कुटुंबावर टीका करत त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा पाढा वाचला. तसेच, ज्येष्ठ नेते नरेंद्र राजानी यांनीही कलानी कुटुंबाचा समाचार घेतला. आमदार कुमार आयलानी यांनी कलानी कुटुंबाकडून कोणीही उमेदवार असला तरी विजय मात्र भाजपचाच होईल, असा विश्वास व्यक्त केला. या बैठकीला मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, जमनु पूरस्वानी, संजय गुप्ता, प्रशांत पाटील, नरेंद्र राजानी, मीना आयलानी आदी उपस्थित होते.