Month: August 2024

माळी समाज मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ

ठाणे : श्री संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त ठाण्यात माळी समाज मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तसेच माळी समाज स्नेह संमेलन एनकेटी हॉल, ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपा…

संजय वढावकर यांच्या नेतृत्वाखाली बेक केमिकलमध्ये १५ हजारापर्यंत पगारवाढीचा करार

अनिल ठाणेकर     ठाणे : जनरल मजदूर सभेचे सरचिटणीस संजय वढावकर यांच्या नेतृत्वाखाली बेक केमिकल प्रा. लि., एम.आय.डी.सी., धाटाव, रोहा या कंपनीतीलकामगारांना रुपये १२,०००/- ते १५,०००/- एवढा भरघोस पगारवाढीचा…

रामशेठ ठाकूर व आ. प्रशांत ठाकूर यांनी सामाजिक वसा जपला-रवीशेठ पाटील*

अशोक गायकवाड     पनवेल : आपल्या खिशातील पैसे खर्च करून समाजोपयोगी कामे करणारे मोजकीच आहेत मात्र लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर हे सतत आणि अखंडपणे समाजाची सेवा करण्याचे…

माविआचा जागावाटपासाठीचा मुहुर्त ठरला

 २० ऑगस्टला राहुल गांधी, खर्गे मुंबईत येणार स्वाती घोसाळकर मुंबई : विधानसभेसाठी अवघे तीन महिने शिल्लक आहेत. सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडूनही या निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. त्यात मविआने मात्र…

बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार ७२ जणांचा मृत्यू,१०० हून अधिक जखमी

ढाका : बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. या हिंसक घटनेत ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर बांगलादेशमध्ये अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लावण्यात आला असून इंटरनेटदेखील बंद करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारनेही या घटनेनंतर बांगलादेशमधील भारतीय नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच येथील भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबरदेखील जारी करण्यात आला आहे.  पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी काही नागरिकांनी अहसहकार आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार हे नागरिक या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ढाक्यातील सायन्स लॅब चौकात दाखल झाले होते. मात्र, यावेळी त्यांना अवामी लीग, छात्र लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. याशिवाय काही आंदोलनकांनी ढाक्याच्या शाहबाग भागातील बंगबंधू शेख मुजीब वैद्यकीय महाविद्यालयासह या भागातील काही कार्यालय आणि आस्थापनांवरही हल्ले केले. विशेष म्हणजे काही आंदोलक लाठ्या-काठ्या घेऊन शाहबाग चौकात जमले, तेव्हा पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या घटनेनंतर आता बांगलादेशच्या गृहमंत्रालयाने देशात अनिश्चित काळासाठी कर्फ्यूची घोषणा केली आहे. तसेच इंटरनेटदेखील बंद करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या घटनेनंतर भारत सरकारने बांगलादेशमधील भारतीयांना घराबाहेर न पडण्याच्या सुचना केल्या आहेत. तसेच भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबरदेखील जारी केला आहे. बांगलादेशमधील भारतीय नागरिकांना कोणतीही मदत हवी असल्यास +88-01313076402 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन भारतीय दुतावासाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सरकारी नोकऱ्यांसाठी असलेल्या आरक्षणाची पद्धत रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केले होते. यावेळीसुद्धा बांगलादेशमधील विविध भागात हिंसासाचाराच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमध्ये जवळपास २०० जणांचा मृत्यू झाला होता. तर शेकडो नागरिक जखमी झाले होते. या आंदोलनानंतर अखेर बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने हा आरक्षणासंदर्भातील सरकारचा निर्णय रद्द केला होता.

जरांगेंचा नारायण राणेंसह राम कदमांना इशारा

जरांगेंचा नारायण राणेंसह राम कदमांना इशारा बीड : राज्यातील मराठा आरक्षणाचा  प्रश्न सोडवण्यासाठी समाजम्हणून आपल्यालच निवडणूकीच्या रिंगणात उतरावे लागेल. ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी कागदपत्रांची तयारी ठेवा. ठरलेल्या एकाच उमेदवाराच्या पाठीमागे समाजाने उभे राहायचं असा आवाहन करतानाच मनोज जरांगे यांनी भाजपा आमदार राम कदम आणि खासदार नारायण राणे यांनाही इशारा दिलाय. राम कदम यांचा दहीहंडी आमदार म्हणून उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांसह नारायण राणेंनाही त्यांनी चांगलंच फटकारले. विधानसभेत कोणाला पाडायचं हे 29 ऑगस्ट ला ठरवणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. ‘मराठवाड्यात जाऊन एकदा बघतोच मनोज जरांगे काय करतात’, असं नारायण राणेंनी म्हटल्यानंतर मनोज जरांगे यांनी आज त्यांना प्रत्युत्तर दिलंय. मी दादांना म्हटलंच नाही मराठवाड्यात यायचं नाही. तुम्ही काय बघून घेणार. मी जर समजा म्हणलोच तर तुमचं कोकणात जाणं ही अवघड होईल असं मनोज जरांगे म्हणाले. आमदार राम कदम यांनी कशाला यात उडी घ्यावी असं म्हणत रात्रंदिवस हे भाकरी खात नाही ताकच पितेत. मी स्वाभिमान गहाण ठेवून पक्षासाठी काम करणारा त्यांच्यासारखा नाही. मला माझा मराठा मोठा करायचा आहे हे मी ठरवलंय. असे जरांगे म्हणाले.…

 पाणी गुणवत्ता तपासणीची विशेष चाचणी मोहीम संपन्न

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकाच दिवशी 1 हजाराहून अधिक   नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणारा पाणीपुरवठा स्वच्छ व शुध्द असावा याची काळजी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने घेण्यात येत असून विविध ठिकाणांहून दररोज 110 पाणी नमुने तपासण्यात येत असतात. सध्याच्या पावसाळी कालावधी लक्षात घेऊन यामध्ये वाढ करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने पाणीपुरवठा विभागास देण्यात आले होते, त्या अनुषंगाने रविवारी सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने नागरिक घरी असतात हे लक्षात घेऊन आयुक्त महोदयांच्या संकल्पनेतून पाणी गुणवत्ता तपासणीची विशेष मोहीम आज संपूर्ण महापालिका क्षेत्रात व्यापक प्रमाणात राबविण्यात आली. यामध्ये नेहमीपेक्षा 10 पट अधिक म्हणजे 1000 पेक्षा अधिक पाणी नमुने महापालिका क्षेत्रातील विविध भागांतून संकलित करण्यात आले व त्यांची गुणवत्ता प्रयोगशाळेत तपासण्यात आली. या विशेष मोहीमेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.* केंद्र सरकारमार्फत ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत *‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’* हे विशेष अभियान जाहीर करण्यात आले असून त्या अनुषंगाने स्वच्छता व आरोग्याचा संदेश अधोरेखित करण्यात आलेला आहे. या अभियानात आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका उत्साहाने सहभागी झाली असून स्वच्छता आणि आरोग्याशी संबंधित विविध उपक्रम लोकसहभागावर भर देत मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत. अशाच प्रकारे *नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत पाणी गुणवत्ता तपासणी करण्याचा हा अभिनव उपक्रम व्यापक स्वरूपात राबविण्यात आला असल्याचे अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे यांनी सांगितले.* या पाण्याच्या चाचणी मोहीमेंतर्गत महापालिका क्षेत्रातील घरे, सोसायट्या, गावठाण व झोपडपट्टी भाग, वाणिज्य संकुले, शैक्षणिक व इतर संस्था अशा विविध ठिकाणांहून तसेच मुख्य जलवाहिनी, भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र, जलकुंभ अशा ठिकाणांवरूनही पाण्याचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. या गुणवत्ता चाचणीमध्ये पिण्याच्या पाण्यातील पीएच (pH), Turbidity, TDS (Total Disssolved Solids), Residual Cholrine इत्यादी घटकांची चाचणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या 8 ठिकाणी असलेल्या प्रयोगशाळांमध्ये करण्यात येत आहे. तसेच E-Coli ही चाचणी महानगरपालिकेच्या मध्यवर्ती प्रयोगशाळेत तसेच कोकण भवन येथील शासनाच्या प्रयोगशाळेमध्ये करण्यात येत आहे. सेक्टर 50 मलप्रक्रिया केंद्र येथील प्रयोगशाळेत पाणी नमुने तपासणीप्रसंगी अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिेंदे, कार्यकारी अभियंता श्री. शंकर जाधव व श्री. वसंत पडघन, उपअभियंता श्री.सचिन शिंदे, उपअभियंता स्वप्निल देसाई, कनिष्ठ अभियंता श्री.किरण सानप व श्री.वैभव देशमुख उपस्थित होते. या मोहीमेत सर्वच विभागातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अनमोल योगदान दिले. *पावसाळी कालावधीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार पाण्याच्या नियमितपणे होणा-या गुणवत्ता चाचणी संख्येत लक्षणीय वाढ केल्याने नमुंमपा क्षेत्रातील पाणी गुणवत्तेचे प्रमाण अधिक बारकाईने लक्षात येईल व त्यानुसार आवश्यकता भासल्यास सुधारणा करणे शक्य होईल असे सांगत अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने त्यांना उत्तम गुणवत्तेचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम उपयोगी असल्याचे मत व्यक्त केले. या उपक्रमाला नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करीत त्यांनी पुढील काही दिवसात आणखी एकदा अशा प्रकारची पाणी गुणवत्ता तपासणी मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात येईल अशी माहिती दिली आहे. 00000

बाळाच्या जन्मानंतर पहिले ६ महीने निव्वळ स्तनपानाच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे –  डॉ. गंगाधर परगे

ठाणे : बाळाच्या जन्मानंतर पहिले ६ महीने निव्वळ स्तनपानाच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करणे हे या सप्ताहाचे प्रमुख उद्दिष्ट आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिले. तर पहिले ६ महीने निव्वळ स्तनपान देणे हे कुटुंबाचे उद्दिष्ट असले पाहिजे. मातेला स्तनपान देण्यासाठी कुटुंबातील व्यक्तिनी प्रोत्साहन करण्यासोबतच मानसिक आधार देणेदेखील आवश्यक आहे. मातेला पौष्टिक आहार देण्यासोबतच तिला पुरेशी विश्रांती मिळेल याची काळजी कुटुंबाने घ्यायला हवी असे आवाहन जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील यांनी दिली. दरवर्षी १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान दिन हा संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. यावर्षीही केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह ठाणे जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामार्फत साजरा केला जात आहे. स्तनपान करणाऱ्या मातांकरिता सुरक्षित वातावरण निर्माण करणे, बालमृत्यु कमी करणे, बाळाच्या जन्मानंतर पहिले ६ महीने निव्वळ स्तनपानाच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करणे हे या सप्ताहाचे प्रमुख उद्दिष्ट आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिले. यावर्षी जागतिक सप्ताहासाठी “आई आणि बाळा मधील अंतर कमी करूया: स्तनपानाला समर्थन देऊया” ही थीम निश्चित करण्यात आली आहे. या सप्ताहाच्या अनुषंगाने सर्व प्रा. आ. केंद्र, उपकेंद्र, नागरी दवाखाने या स्तरावर हिरकणी कक्षाचे बळकटीकरण करण्यात येणार असून मातांच्या गोपनीयता व सुरक्षेवर भर देण्यात येत आहे. या सप्ताहाच्या अनुषंगाने प्रसूती विभागात काम करणाऱ्या सर्व वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम, समुदाय आरोग्य अधिकारी यांचे जन्मानंतर एका तासाच्या आत लवकरात लवकर स्तनपानाची सुरुवात, कोलस्ट्रम फीडिंग, निव्वळ स्तनपान याबाबत प्रशिक्षण आयोजित केले आहे. तसेच आरोग्य संस्था स्तरावर नवीन मातांना देखील स्तनपानाबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. Infant Milk Substitute Act (IMS act) अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना Milk formula food, दुधाची बाटली, मातेच्या दुधाला पर्यायी पदार्थ व आहार व उपकरणे यासारख्या बाबींना प्रोत्साहन न करण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली. ग्रामीण भागामध्ये स्तनपान व शिशु पोषणाच्या पद्धतीमध्ये विशेष लक्ष दिले जात असून नियमित लासिकरणावेळी, स्तनदा व गरोदर माता ग्रहभेटीदरम्यान स्तनपानाबाबत आरोग्य सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी व आशामार्फत समुपदेशन केले जात असून स्तनदा मातांना आयर्न फोलीक एसिड व कॅल्शिअमच्या गोळ्यांचे १८० दिवस नियमित सेवन करण्याबाबत सांगितले जात आहे. चौकट जन्मानंतर पहिल्या तासात शिशुच्या आयुष्याची सोनेरी सुरुवात करण्यासाठी पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे. जन्मानंतर एका तासाच्या आत स्तनपान सुरू करणे आवश्यक आहे. शिशुला मातेचे सुरुवातीचे घट्ट पिवळे दूध (चिकाचे दूध) देणे अतिशय महत्वाचे आहे. पहिले पिवळे दूध (चिक दूध) हे अनेक आजारांपासून बाळाचे संरक्षण करते. स्तनपान हे माता व बाळ यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करते तसेच बाळाच्या बौद्धिक विकासासाठी महत्वाचे ठरते.  सामान्य अथवा सिजेरियन दोन्ही प्रकारच्या प्रसूतिनंतर एका तासाच्या आत लवकरात लवकर स्तनपान सुरू केले पाहिजे. सुरुवातीच्या काळात दिवसातून ८ ते १२ वेळा स्तनपान देण्यात यावे. जन्मानंतर मातेच्या त्वचेचा स्पर्श शिशुला त्वरित होणे आवश्यक आहे. रात्रंदिवस शिशुला मातेच्या संपर्कात ठेवणे आवश्यक आहे त्यांना वेगळ करता कामा नये. पहिले सहा महिने शिशुला निव्वळ स्तनपानच दिले गेले पाहिजे. स्तनपानाखेरीज शिशुला गुटी, मध, साखरेचे पानी किवा इतर पेय अजिबात देता कामा नये. स्तनदा मातांनी दररोज ३ वेळा जेवण करावे व त्याव्यतिरिक्त २ वेळा थोडे छोटेसे जेवण किंवा फराळ घ्यावा ज्यामुळे दूध वाढण्यास मदत होते. 00000

‘प्रो गोविंदा सीझन- २’ मधील१६ संघांचा नामकरण व जर्सी अनावरण सोहळा

मराठमोळ्या गोविंदाचे रूपांतर स्पोर्ट्समध्ये स्वप्न पूर्ण- प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर     ठाणे :  ‘मी स्वप्न पाहिलं होते की आपला मराठमोळ्या गोविंदाचे रूपांतर स्पोर्ट्समध्ये व्हावे ही इच्छा युवासेना कार्याध्यक्ष तथा प्रो गोविंदा लीग अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात प्रो गोविंदाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे याचे समाधान वाटते,’ असे मत आमदार प्रताप सरनाईक याप्रसंगी यांनी व्यक्त केले. तर प्रो गोविंदा खेळाचे व्यावसायिकीकरण तसेच या खेळाला प्रोफेशनल टच मिळावा यासाठी आज अलॅाटमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या माध्यमातून गोविंदा खेळाला नक्कीच प्रतिष्ठा प्राप्त होईल व खेळाडूंमध्ये आत्मविश्वास दृढ होईल असा विश्र्वास प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केला. प्रो गोविंदा सीझन-२ मध्ये अंतिम फेरीत निवड झालेल्या १६ संघांचे नामकरण व जर्सी अनावरण सोहळा ताज लँड्स एंड हॉटेल, बांद्रा मुंबई येथे पार पडला. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक, डोम सिनेयुग कंपनीचे संचलाक अध्यक्ष मोहम्मद मोरानी, डोम एन्टरटेन्मेंटचे व्यवस्थापकीय संचालक मजहर नाडियादवाला आदी मान्यवर उपस्थित होते. गोविंदा या खेळाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा त्याचप्रमाणे या खेळाचे व्यावसायिकीकरण व्हावे यासाठी प्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ज्या प्रमाणे क्रिकेट, कबड्डी खेळाला व्यासपीठ मिळून हा खेळ मोठा झाला. त्याचप्रमाणे गोविंदा या मराठमोळा खेळाला मोठं करण्यासाठी व त्याला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मागील दोन वर्षांपासून आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने व प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश नेतृत्वात प्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा प्रो गोविंदा सीझन २ मोठ्या जल्लोषात १८ ऑगस्ट, २०२४ रोजी वरळी येथील NSCI डोम येथे होणार आहे. प्रो गोविंदा सीझन २ साठी १६ संघांची निवड करण्यात आली. या संघांचे नामकरण, अलॅाटमेंट प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली तसेच १६ संघांच्या जर्सीचे अनावरणही करण्यात आले. आयपीएल प्रमाणे प्रत्येक संघ एक एक मालकाने निवडला असून पुढील सीझनपर्यंत हे संघ या मालकांकडे राहणार आहेत. चौकट गोविंदा पथकाचे नाव व मालक यांची यादी पुढीलप्रमाणे १.  कोकण नगर (कोकण गिन्ट्स) – डॉ. नलीन गुप्ता २. जय जवान (सातारा सिंघम) – श्री. प्रतीक शेळके ३. यश गोविंदा पथक ( लातूर लेजेण्ड्स)  – श्री. विनय चौघ ४. श्री आग्रेश्वर गोविंदा पथक (नाशिक चॅलेंजर)  –  श्री. अजित सिंग मित्रा ५. शिव गणेश गोविंदा (संभाजी नगर रॉयल) – श्री. विजय पटेल ६. हिंदू एकता गोविंदा पथक (रायगड रॉयल) – श्रीमती अनुष्का गुप्ता आणि श्री. रोहन गुप्ता ७. ओम ब्रह्मांड साई गोविंदा ( सेट्रल मुंबई) – श्री. चंद्रेश विठलानी…