Month: August 2024

माळी समाज मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न

ठाणे : श्री संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त ठाण्यात माळी समाज मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तसेच माळी समाज स्नेह संमेलन एनकेटी हॉल, ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपा मिडिया सेल केंद्रीय समन्वयक तथा कोकण पदवीधर आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्यांक विभाग निरीक्षक नजीब मुल्ला, माजी नगरसेवक मनोहर डुंबरे, माळी समाज अध्यक्ष नवनीत सिनलकर, कार्याध्यक्ष डॉ. अक्षय झोडगे, उपाध्यक्ष श्रीधर रासकर, सरचिटणीस स्वप्नील वाघोले, खजिनदार दशरथ साबळे, महिला संघटक अलका सिनलकर, महिला उपाध्यक्ष अरुंधती डोमाळे आदी मान्यवर उपस्थित होते. 00000

मुंब्र्याच्या बदनामी विरोधात सर्वधर्मीय युवक अभियान राबविणार !

ठाणे : गेल्या १५ वर्षात मुंब्रा प्रचंड प्रमाणात विकास झाला आहे. पायाभूत सुविधांमध्ये मुंब्रा आज इतर शहरांच्या तुलनेत विकसित होत आहे. तरीही, काही ठराविक लोकांकडून मुंब्र्याला बदनाम केले जात आहे.…

घोडा माझा लाडका – डॉ.जितेंद्र आव्हाड यांची मिश्कील टीप्पणी !

ठाणे : मुंबई पोलीस दलात पुन्हा एकदा अश्वदल पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवारचे नेते डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी मिश्कील टीप्पणी केली आहे. “घोडा माझा लाडका” अशी…

पीआरपीच्या ठाणे जिल्हा महिलाध्यक्षपदी मीना अलिंग यांची नियुक्ती

अनिल ठाणेकर   ठाणे : पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या ठाणे जिल्हा महिलाध्यक्षपदी मीना अलिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान केले. प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्या  म्हणून मिना दादाराव अलिंग यांची ओळख  आहे. याआधी त्यांनी वॉर्ड अध्यक्ष, ठाणे जिल्हा महासचिव, ठाणे शहराध्यक्ष अशी पदे भूषविलेली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मीना अलिंग या सामाजिक चळवळीत सक्रीय आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊनच त्यांची ठाणे जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली  प्रा. कवाडे यांनी नियुक्तीपत्र देताना मीनाताई अलिंग यांचे कौतूक केले. तसेच , पक्षसंघटना वाढविण्याचे आदेश दिले. याप्रसंगी  उल्हासनगरचे माजी नगरसेवक, पीआरपीचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले, रायगड जिल्हा युवा अध्यक्ष सचिन तांबे,  महेंद्र पवार, सायली, आनंद कडाले, अनिल रुकमारे, बीड जिल्हा सचिव लक्ष्मण कांबळे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष दिलीप कापसे,  बेबीताई आदी मान्यवर उपस्थित होते.

दिवा रेल्वे उड्डाण पुल उभारणीचा मार्ग मोकळा

ठाणे : दिवा पुर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱ्या रेल्वे उड्डाण पुल उभारणीच्या कामामध्ये बहुमजली इमारती, उच्च दाब विद्युतवाहिन्या आणि भुसंपादनचा अडथळा निर्माण झाल्याने काम रखडले आहे. यामुळे पालिका प्रशासनाने पुलाच्या…

कल्याणच्या सहजानंद चौकात होर्डिंग कोसळून अपघात, दोन जण जखमी,

कल्याण : कल्याणच्या सहजानंद चौकात होर्डिंग कोसळून मोठा अपघात झाला आहे. सहजानंद चौक हा कल्याण शहरातला गजबजलेला चौक आहे. या चौकात ऐन गर्दीच्या वेळी भलं मोठं होर्डिंग कोसळून अपघात झाला…

सर्व योजनांचे रुपांतरण करुन गावात कारखाना उभा करण्यासाठी प्रयत्न करा-कीर्ती किरण पुजार

अशोक गायकवाड   रत्नागिरी : केंद्र शासन, राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेऊन गावामध्ये छोटे उद्योजक तयार झाले आहेत. या सर्व योजनांचे रुपांतरण करुन एकत्रितपणे गावागावात कारखाने निर्माण करता येतील…

विशाळगड प्रकरणाची सखोल चौकशी करावी

रमेश औताडे     मुंबई :विशाळगड अनधिकृत बांधकाम प्रकरण सध्या गाजत असताना ‘असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ कैंसिल रिचटिगेट द ट्रोल’ व ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ सेक्युलरिजम’ या संघटनांनी या सर्व…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण सन्मान यात्रेला सुरुवात

योजनेच्या प्रचारासाठी शिवसेनेकडून राज्यभरात महिला मेळाव्यांचे आयोजन शिवसेना सचिव व प्रवक्त्या मा. डॉ मनीषा कायंदे यांची माहिती   मुंबई : महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला जबरदस्त प्रतिसाद मिळत…