Month: September 2024

सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील युवासेनेने १० पैकी १० जागांवर विजय मिळवला आहे. परंतु, आता सिनेट निवडणुकीच्या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे.  मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया (मतदार नोंदणीपासून अंतिम मतदार यादीपर्यंत) असंविधानिक आणि…

आरक्षण संपवण्याच्या हालचाली- प्रकाश आंबेडकर

जळगाव :  आरक्षण कायमचं संपलं पाहिजे, या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना व भाजप हे चारही पक्ष एक आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. जळगाव  येथे पत्रकार परिषदेत ते बोलत…

शरद पवार हे राज्यातील मिनी औरंगजेब- पडळकर

अहमदनगर: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार हे राज्यातील मिनी औरंगजेब आहेत. आपल्या आयुष्यात शरद पवार फक्त दोन वेळेस रायगडावर गेले आहेत. नुकतेच शरद पवारांसमोर अहमदनगरचे नाव अहमदनगरच राहिले पाहिजे म्हणून घोषणाबाजी करण्यात आलीय. त्यामुळे ही घोषणाबाजी…

महाराष्ट्र वाल्मीकी गदिमा

मराठीतील श्रेष्ठ साहित्यिक, कवी, गीतकार, पटकथा लेखक ग. दि. माडगूळकर उर्फ ग. दि. मा यांची आज १०५ वि जयंती. १ ऑक्टोबर १९१९ रोजी जन्मलेल्या गदिमांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध…

आर्थिक विकास महामंडळाच्या बाबतीत सरकारने दखल घ्यावी

महाराष्ट्र कलाल-कलार संघटनेच्या वतीने समाजाच्या कल्याणासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे,पारंपरिक मद्य व्यवसाय समाजाला माफक दरात उपलब्ध करून देण्यात यावा व इतरही मागण्यांच्या संदर्भात गेल्या दोन वर्षांपासून संघटनेचा संघर्ष…

आयटी कंपन्यांमध्ये एवढा ताण कशाचा?

नोंद प्रसाद देशपांडे बड्या तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील नोकरीभोवतीचे वलय गेल्या काही वर्षांमध्ये काहीसे फिकट झाले आहे. कामाचा अतीताण आणि त्यामुळे होणाऱ्या मानसिक-शारीरिक त्रासाच्या घटनांमुळे खळबळ माजली आहे. अलिकडेच एका मोठ्या…

कांद्याचा विधानसभेलाही वांदा

शेतीमालाच्या धोरणाच्या बाबतीत धरसोडपणा सरकारला विधानसभेच्या निवडणुकीतही नडण्याची शक्यता आहे. कांदा जास्त असताना निर्यातबंदी, निर्यातशुल्कात वाढ असे आततायी निर्णय घेतले. वारंवार मागणी करूनही निर्यातबंदी हटवली नाही. गुजरात, कर्नाटकचा कांदा निर्यात…

नाभिक समाजाला काँग्रेसच न्याय दईले- नाना पटोले

मुंबई : नाभिक समाजाला काँग्रेसच न्याय देईल. आमचे सरकार आल्यास तुमच्या मागण्या पुर्ण करु असा विश्वास काँग्रेसचे प्रदशाध्यक्ष नाना पटोले यांना मुंबईतील आझाद मैदानात आयोजीत सकल नाभिक समाजाच्या महाआंदोलनास भेट देऊन दिला. समाजातील वंचित घटकांना…

आम्हीच गतीमान शक्तिमान या भ्रमातून बाहेर पडा – वडेट्टीवार

मुंबई  :  आम्हीच शक्तिमान आणि आमचं सरकार गतिमान‘ या भ्रमातून महायुती सरकारने आता बाहेर पडावं. असा सल्ला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विटच्या माध्यमातून सरकारला दिला आहे. आपल्या ट्विट मधून वडेट्टचीवार म्हणतात की, महाराष्ट्रात गुंतवणूक वाढवणे तर महायुती सरकारला जमलेच, वरून जी गुंतवणूक, उद्योग आधीपासून होते ते सुद्धा यांना टिकवून ठेवता आले नाही.पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहत हे वाहन निर्मिती उद्योगासाठी महत्त्वाचे केंद्र आहे. परंतु येथील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाल्यामुळे येथील उद्योगांना इतर राज्यांमध्ये स्थलांतरित व्हावे लागत आहे. महायुती सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे मेक ईन महाराष्ट्र ऐवजी क्वाईट महाराष्ट्र सुरू झाले. असे स्पष्ट करून वडेट्टीवार म्हणतात की भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वतः मान्य करतात की महाराष्ट्र गुंतवणूक येत नाही, महाराष्ट्रातील नागपूर सारखे शहर स्मार्ट होवू शकत नाही.पक्षातील मंत्री, उद्योग समूह, संघटना, जनता सर्व मिळून महायुती सरकारचे लक्ष या स्थितीकडे वेधण्याचा प्रयत्न करत आहे. पण हे मुजोर सत्ताधारी काही एकायला तयार नाही. इंजिन एक असो की ट्रीपल महायुती सरकारने भ्रमातून आता बाहेर यावे. अशी घणाघाती टिका वडेट्टीवार यांनी केली आहे.

गाई आता ‘राज्यमाता’

मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी  मुंबई : गाईंना आता राज्यमातेचा दर्जा महाराष्ट्रात देण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. त्यामध्ये गाईंना राज्यमातेचा दर्जा देण्यासह विविध खात्यांसह एकूण ३८ निर्णय घेण्यात आले…