संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्ता सन्मान दिवसाचे साधणार औचित्य
ठाणे : संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री ऍड.मनोजदादा आखरे यांच्या वाढदिवसाचे – ३ सप्टेंबरचे औचित्य साधून कार्यकर्ता सन्मान या उपक्रमांतर्गत संभाजी ब्रिगेडच्या ठाणे जिल्हा शाखेतर्फे समाजातील अन्यायाला वाचा फोडणाऱ्या पत्रकारांना गौरवण्यात येणार आहे. त्यात ठाणे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि ठाणेवैभवचे वरिष्ठ पत्रकार आनंद कांबळे, दैनिक सामनाचे ठाणे विभाग प्रमुख राजेश पोवळे आणि दैनिक पुढारीचे जेष्ठ पत्रकार दिलीप शिंदे यांचा समावेश आहे.
यासंदर्भात संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार म्हणाले, लोकशाहीचा चौथ स्तंभ असणारे पत्रकार वेळ काळ याची पर्वा न करता जनसामन्यांवर होणाऱ्या अन्यायाचा पर्दाफार्श करत असतात. काहीवेळा त्यांना अतिरेकी प्रसंगालाही सामोरे जावे लागते. करोना काळात जीवाची पर्वा न करता पत्रकारांनी वस्तुस्थिती समोर मंडळी होती. त्यांच्या कामाची दखल घेऊन संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री ऍड मनोजदादाआखरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात पत्रकारांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. ठाणे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि दैनिक ठाणेवैभवचे आनंद कांबळे, दैनिक सामनाचे राजेश पोवळे, दैनिक पुढारीचे दिलीप शिंदे, एबीपी माझा वृत्तवाहिनीचे अक्षय भाटकर, टीव्ही नाईनचे गणेश थोरात, पुढारी वृत्तवाहिनीचे निकेश शार्दूल, स्थानिक श्री वृत्तवाहिनीचे अमर राजभर, एस नाईनच्या संपादिका अनघा सुर्वे आणि सारिका साळुंखे यांना सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ३ सप्टेंबर रोजी ठाणे महापालीकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात होणार असून या कार्यक्रमात संघटनेतील क्रियाशील कार्यकर्त्यांनाही गौरवण्यात येणार असल्याचे उपाध्यक्ष शिवश्री प्रशांत गिरी यांनी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ठाण्याच्या महिला आघाडी प्रमुख शिवमती आरती रामटेके, कार्यध्यक्षा शिवमती कविता साळवे, शिवमती अश्विनी गायकवाड, अनुराधा पोतदार ,कळवा-विटावा विभागाचे उपाध्यक्ष शिवश्री प्रथमेश विरघळ, मुंब्रा कौसा विभागाचे उपाध्यक्ष शिवश्री जुनैद अन्सारी मेहनत घेत आहेत.
0000