बोरिवली येथून कोकणसाठी रेल्वेगाडी गुरूवारपासून सुरू
पियुष गोयल यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची गणेशोत्सवापूर्वीच केली पूर्ती
मुंबई : केंद्रीय वाणिज्य मंत्री खासदार पियूष गोयल यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कोकण वासियांसाठी बोरिवलीतून कोकणासाठी गाड्या सोडण्याचे वचन दिले होते. कोकणसाठी बोरिवली येथून ट्रेन सोडावी अशी अनेक वर्षांपासूनची कोकणवासीयांची सरकारकडे मागणी होती.
केंद्रीय मंत्री खा.पियूष गोयल यांनी निवडून आल्यानंतर या मागणीवर लगेचच निर्णय घेतले.
गुरूवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी दुपारी १२.५० वा. बोरीवली वरुन सुटणार्या कोकण रेल्वेच्या उद्घाटन सोहळाचे आयोजन करण्यात आले होते.
उत्तर मुंबई खासदार केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय रेल्वे व माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव (आभासी प्रक्रियेने उपस्थित), मुंबई भाजप अध्यक्ष आ. ऍड.आशिष शेलार, माजी खा.गोपाळ शेट्टी, सर्व आमदार प्रवीणभाऊ दरेकर, सौ.मनीषा चौधरी, अतुल भातखळकर, योगेश सागर, सुनील राणे, प्रकाश सुर्वे, वरिष्ठ नेते आमदार भाई गिरकर, रेल्वेचे सर्व अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते आणि या सर्वांची यावेळी भाषणे झाली.
यावेळी बोरिवलीतून कोकणसाठी सुटणाऱ्या पहिल्या गाडीला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करून गाडी कोकणसाठी रवाना करण्यात आली.
या वेळी आभासी उपस्थितीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या भाषणात मुंबई रेल्वे साठी केंद्रातून केलेल्या तरतुदींचे विषय मांडले. उत्तर मुंबई खासदार म्हणून केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले की, १७० वर्षात पहिल्यांदा आज बोरिवलीतून ट्रेन सुटणार आहे. आणि ही गाडी वसई ,पनवेल येथून कोकण पर्यंत जाणार आहे. यासाठी श्री، गोयल यांनी आपले केंद्रात सहकारी श्री، वैष्णव यांचे धन्यवाद मानले.
बोरिवली स्थानक पूर्व येथे मोठ्या संख्येने नागरिक आणि विशेषत: कोकणवासीयांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी ,केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे अभिनंदन केले आणि त्यांना धन्यवाद दिले.
0000