मुंबई : लाडकी बहीण योजना गावागावात पसरल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीय. काँग्रेसचे लोक या लाडक्या बहिणीच्या विरोधात आडवे आले आहेत. ही योजना बंद करण्यासाठी विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र न्यायालय आमच्या लाडक्या बहिणींना न्याय देईल असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. लाडक्या बहिण योजनेला खोडा घालणाऱ्यांना बहीणी जोडा मारल्याशिवाय राहणार नाहीत असेही मुख्यमंत्री म्हणाले.

लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी काही लोक कोर्टात गेले आहेत. त्यांचा इतिहास बघा. कुणाचे आहेत हे लोक. मी तेव्हाही म्हणालो होतो कोर्ट आमच्या बहिणीवर अन्याय करणार नाही. बहिणींना न्याय देईल. उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

आज मुंबईत महाविकास आघाडीच्या वतीनं सरकारच्या विरोधात जोडे मारो आंजोलन करण्यात आलं. यावर देखील मुख्यमंत्र्यांनी टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची घटना दुर्दैवी आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम्ही तिघांनी माफी मागितली आहे. झालेली घटना दुर्दैवी आहेच. पण, त्याच राजकारण करणे हे त्यापेक्षाही दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे म्हणाले. कर्नाटक काँग्रेस सरकरकारच्या काळात मागील वर्षी जी दुर्घटना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यासाठी दोन दोन जेसीबीचा वापर केला. खरंतर त्यांना जोडे मारले पाहिजेत. जोडे मारो आंदोलन करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता नक्की जोडी मारेल असंही मुख्यमंत्री म्हणाले.

लाकडी बहिण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारनं पहिल्या टप्प्यात १ कोटी ८ लाख पात्र महिलांच्या खात्यावर प्रत्येकी तान हजार रुपये पाठवले होते. आता काल ३१ ऑगस्टला दुसऱ्या टप्प्यात ५० लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये पाठवले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *