बदलापूर – बदलापुरात चिमुकल्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर उद्रेक होऊन झालेल्या आंदोलनात हजारो नागरिकांवर गुन्हे दाखल झाले. मात्र, वकील संघटनांनी आंदोलनकर्त्यांची केस मोफत लढून न त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा दिला. आंदोलनानंतर पोलिसांकडून धरपकड सुरूच असून, आरोपींना न्यायालयात हजर करण्याचे काम सुरू आहे. वकील संघटनेने आतापर्यंत तब्बल १०५ आंदोलनकर्त्यांची – जामिनावर सुटका केली.

बदलापूर, उल्हासनगर व कल्याणमधील वकील संघटनांनी रेल रोको, शाळेची तोडफोड रेल रोको आंदोलनात ज्या नागरिकांवर गुन्हे दाखल केले. त्यातील ५८ जणांची जामिनावर सुटका करण्यासाठी वकील संघटनेने हातभार लावला. शाळेची तोडफोड केल्याप्रकरणी ज्यांना अटक केली त्यापैकी ४७ जणांची सुटकेसाठी वकील संघटनेने मदत केली.

बदलापूर आंदोलनात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत्यांची केस मोफत लढण्याचा निर्णय घेतलावकील संघटनांनी आरोपींना जामीन मिळण्यासाठी योग्य ती मदतदेखील केलीया प्रकरणात अनेक सर्वसामान्य कुटुंबांतील नागरिक असल्यामुळे त्यांना वकील नियुक्त करणेत्यांची फी देणे आम्ही वकिलांनी केलेले काम एका वकिलाचे नसूनते संपूर्ण संघटनेचे आहेकल्याणउल्हासनगर आणि बदलापुरातील बहुसंख्य वकिलानी आम्हाला या कामात मोलाचे योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *