ठाणे : महाराष्ट्रवादी व्हाॅट्स्ॲप हेल्पलाईन ९८६१ ७१७१७१. या नंबरवर राज्यातील सर्व शासकीय योजनांची माहिती उपलब्ध आहे. यासाठी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस ठाणेकरांच्या मदतीसाठी, सेवेसाठी तत्पर असून महाराष्ट्रवादी व्हाॅट्स्ॲप हेल्पलाईनचा लाभ घ्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी तमाम ठाणेकर नागरिकांना केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष, खासदार सुनीलजी तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांनी, पक्षातर्फे नुकतीच ‘महाराष्ट्रवादी व्हाॅट्स्ॲप हेल्पलाईन’ सुरु केली आहे. हा व्हाॅट्स्ॲप नंबर आहे ९८६१ ७१७१७१. या नंबरवर राज्यातील सर्व शासकीय योजनांची माहिती या व्हाॅट्स्ॲप नंबरवर दिली जाईल. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा सन २०२४-२५ सालचा अर्थसंकल्प सादर करताना ज्या घोषणा जाहीर केल्या त्या संपूर्ण घोषणांची माहिती या एका फोननंबरवर मिळू शकते. या व्हाॅट्स्ॲप नंबरला ‘Hi’ टाईप केल्यानंतर लगेच आपली भाषा, जिल्हा, मतदार संघ, लिंग आदी माहिती आपल्याला फीड करायची आहे. ज्या योजनेची माहिती हवी असेल त्या योजनेचे नाव टाईप करायचे आहे. आपल्याला फक्त माहिती हवी असेल तर माहिती मिळेल, यापेक्षा अधिक काही माहिती हवी असेल तर ‘मदत’ हा पर्याय निवडायचा आहे. त्यानुसार पर्यायाची पुष्टी करण्यात येईल. आपली तक्रार ही सेंट्रलाईज काॅलसेंटरला सरळ जाते. या काॅलसेंटरच्या माध्यमातून ज्या माताभगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा फाॅर्म भरण्यासंदर्भात काही अडचण येत असेल, अशाप्रकारच्या तक्रारीचा व्हाॅट्स्ॲप या नंबरवर केला तर ती महिला जर ठाणे शहर जिल्यातील असेल तर जिल्हाध्यक्ष या नात्याने मला सेंट्रलाईज काॅल सेंटर मधून कळेल. १५ मिनिटात मेसेज येतो आणि मग आमचा राष्ट्रवादीचा स्थानिक कार्यकर्ता किंवा कार्वकर्ती त्या तक्रारदार महिलेला फाॅर्म भरायला जर काही अडचण येत असेल तर ती अडचण आम्ही दूर करतो. अशाप्रकारे ज्या विविध योजना आहेत त्या योजनेची संपूर्ण माहिती या महाराष्ट्रवादी व्हाॅट्स्ॲप नंबर मध्ये दिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हय़च्या वतीने आमच्या भगिनी महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी पिंक रिक्षाची घोषणा या बजेटमध्ये केली होती, ठाणे शहरामधील एक हजार माता भगिनींना पिंक रिक्षाचे परमिट आणि रिक्षा घेण्यासाठी अनुदान हे महाराष्ट्र शासन देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे मध्यवर्ती कार्यालयात संपर्क साधल्यास ठाण्यातील तमाम माताभगिनींना रिक्षाचे ट्रेनिंग, ड्रायव्हिंग लायसन्स ते रिक्षा घेण्यासाठीचा शासनाचा निधी मिळवून देणे यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल. यासाठी महाराष्ट्रवादी व्हाॅट्स्ॲप हेल्पलाईन नंबर ९८६१ ७१७१७१ याचा जास्तीत जास्त लाभ ठाणेकरांनी घ्यावा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा तमाम ठाणेकरांच्या मदतीसाठी व सेवेसाठी तत्पर व हजर आहे, अशी माहिती यावेळी प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिली.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *