स्वाती घोसाळकर

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजां उचा सिंधुदुर्गयेथील राजकोट किल्यावर उभारलेला पुतळा अवघ्या ९ महिन्यात कोसळला. महाराष्ट्राची अस्मितेचा अपमान करणाऱ्या महायुती सरकारला जोडो मारण्याचा राज्यव्यापी आंदोलन महाविकास आघाडीने घेतले होते. उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लाखो कार्यकर्त्यांनी राज्यात महायुतीच्या सरकारला हाण हाण जोडे हाणले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या फोटोला हाणलेले जोडो समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात येऊन याबाबत माफी मागतानाही याबाबत राजकारण केले. अंगाशी आल्यावर माफी मागायची याची यांना सवयच लागलीय. पण ती मागतानाही सावरकरांचा मुद्दा त्यांनी काढला. छत्रपती आणि सावरकरांची तुलना कशी होऊ शकते असा सवाल शरद पवारांनी काढला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या गोषेटीला हात लावतात त्याची मातीच होते अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. महायुती सरकार हे शिवद्रोही सरकार आहे यांना माफी नाही अशी प्रतिक्रीया काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी दिली.

अंगाशी आलं की माफी

मागतात – शरद पवार

मुंबई :  शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. विषय काय? लोकांची अस्वस्था काय? आता विषय काय आहे आणि हे बोलत काय आहेत. आता शिवाजी महाराज आणि सावरकर यांची तुलना होऊ शकते?  ज्यांनी रयतेच राज्य आणल त्यांची तुलना कशा प्रकारे देशाचे पंतप्रधान करतात हे आपण पाहिलं. याचा अर्थ असा की चुकीच्या गोष्टी आणि चुकीच्या विचारांना प्रोत्साहित करता. अंगाशी आलं की माफी मागून सुटका करण्याचा प्रयत्न करता”, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, मुस्लीम समाजाची स्थिती आज चिंताजनक आहे. दारिद्र रेषेखाली असणाऱ्या मुस्लीमांची संख्या दुर्लक्षित करण्यासारखी नाही. शिक्षणाच्या संदर्भात मर्यादीत संधी ज्यांना मिळते, त्यामध्ये मुस्लीम समाजाचे घटक अधिक असतात. मुस्लीमांकडे द्वेषाने बघण्याचा दृष्टीकोण समाजातील काही घटकांमध्ये आहे.

हात लावतील तिकडे सत्यानाश

ही मोदींची गॅरंटी – उद्धव ठाकरे

मुंबई : पूर्वी दादा कोंडकेंचा सिनेमा होतो, बोट लावेल तिथे गुदगुल्या. आता मोदी नवा काढतायत हात लावेल तिकडे सत्यानाश…जिकडे हात हात लावेल तिकडे सत्यनाथ झालाच पाहिजे, ये मोदी की गॅरंटी आहे. अशा सडक्या गॅरंट्या आपल्याला नको आहेत”, असे ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

महायुतीचे सरकार शिवद्रोही- पटोले

आजच्या जोडे मारो आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पेशवाई सरकारकडून महाराजांचा अवमान करण्याचं काम सुरु आहे. शिवद्रोही सरकार परत येऊ देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

नाना पटोले म्हणाले की, राज्यात आणि देशात शिवद्रोही सरकार आले आहे. महाराजांच्या नावाने राजकारण करणे आणि पेशवाईसारखा महाराजांचा अपमान करणे सुरु आहे. कमिशन खोरी आणि भ्रष्टाचारामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे अवमान करण्याचे पाप या सरकारने केले आहे.  मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमा पडला. ती फक्त महाराजांची प्रतिमा नसून तर महाराष्ट्राचा धर्म आणि महाराष्ट्राचा अवमान राज्य आणि केंद्र सरकारने केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या सरकारच्या विरोधात आज आपण ऐकवटलो आहोत.

पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली आणि आम्ही राजकारण करतोय असे विचारले जात आहे. ज्या दिवशी महाराजांचा अवमान या लोकांनी केला त्या दिवशीच महाराष्ट्राच्या जनतेने माफी मागितली की, आम्ही चुकून या सरकारला देशात आणि राज्यात आणले. त्यांनी आमच्या महाराजांचा अपमान केला म्हणून पुढच्या काळात शिवद्रोही सरकार महाराष्ट्रात येऊ देणार नाही, याची शपथ आम्ही घेतली असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *