मुस्लिम बांधवांना मशिदीत घुसून मारण्याची धमकी देणाऱ्या नितेश राणेंवर हाजी शाहनवाज खान आक्रमक
राज भंडारी

 

पनवेल :काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथील रामगिरी महाराज यांनी मुस्लिमांचे धर्मगुरू पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर मुस्लिम समाज एकवटला होता. यावेळी संपूर्ण देशात रामगिरी.महाराजांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र या प्रकरणाला आता आ.नितेश राणे यांनी वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे एआयएमआयएमचे कोकण विभाग प्रभारी तथा विद्यार्थी आघाडी संघटनेचे महाराष्ट्र महासचिव हाजी शाहनवाज खान यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
नुकताच सिंधुदुर्गमधील आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करीत मुसलमानांना मशिदीत घुसून गोळ्या घालण्याची भाषा केल्यामुळे एआयएमआयएमचे कोकण विभाग प्रभारी तथा विद्यार्थी आघाडी संघटनेचे महाराष्ट्र महासचिव हाजी शाहनवाज खान चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी नितेश राणे हा तर बच्चा आहे, आम्ही त्याच्या बापासोबत काम केलं आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे आणि नारायण राणे एकत्र असताना आम्ही काम केलं आहे, त्यावेळी त्यांच्यासमोर मी एक शिवसैनिक म्हणुन खांद्याला खांदा लावून काम केलं, यानंतर मनसेमध्ये राज ठाकरे यांच्यासोबत काम करीत असताना देखील कधी आम्हाला एक मुस्लिम म्हणून हिणवले नाही. आम्ही आमच्या वेळेला नमाज देखील पठण केले, मग ते राज साहेबांच्या कृष्णकुंजवर असेल किंवा मग बाळासाहेब असताना मातोश्रीवर असेल. कधी नारायण राणेंना एक मुस्लिम सोबत असताना फरक पडला नाही आणि नितेश राणे मुस्लिम समाजावर आसूड उगवत आहेत. या नितेश राणे यांच्या वक्तव्यावर हाजी शाहनवाज खान यांनी आक्रमक होत, अरे तुझ्या बापसोबत आम्ही काम केलंय, तू तर एक बच्चा आहेस, तुझी उंची किती आणि तू बोलतोस किती ? असा पलटवार हाजी शाहनवाज खान यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना केला आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *