राजेंद्र साळसकर

 

मुंबई – पोयसर जिमखान्याचे प्रणेते, मार्गदर्शक माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या सौजन्याने राष्ट्रीय खेळ दिनानिमित्त पोयसर जिमखाना स्पोर्ट्सॲव्हरच्या सहकार्याने, “द बर्थ ऑफ ॲथलीट” या विषयावर चर्चासत्र, परिसंवाद, आणि “खेलो मुंबई गेम्स” लोगोचा अनावरण आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बुध्दिबळ पटू श्री. प्रवीण ठिपसे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पूर्व सचिव डॉ. पी. व्हि. शेट्टी, महाराष्ट्र शासनाच्या पूर्व क्रिडा संचालक एन.बी. मोटे, छत्रपती पुरस्कार प्राप्त जया शेट्टी, श्रीमती संध्या देवतळे, संयुक्त संचालक युथ विंग, महाराष्ट्र शासन आणि योगेश दुबे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या वेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते सर्व मान्यवरांना सन्मानित करण्यात आले तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते नवोदित आणि उदयोन्मुख ११ खेळाडूंचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
गोपाळ शेट्टी यांनी मुंबईने अधिकाधिक खेळाडू निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली. नुकत्याच पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सध्या मुंबईचा एकच खेळाडू सहभागी होता, असे त्यांनी नमूद केले. क्रीडापटूंच्या वाढीला चालना देण्यासाठी, त्यांनी पायाभूत सुविधांचा विकास करणे, चांगल्या सुविधा पुरविणे आणि खेलो मुंबई गेम्सच्या बॅनरखाली अधिक स्पर्धांचे आयोजन करणे यावर भर दिला. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांनी सर्व उपस्थितांचे सामूहिक सहकार्य मागितले.
प्रवीण ठिपसे यांनी क्रीडापटूंसाठी सुविधा पुरविण्यात झालेल्या प्रगतीची कबुली दिली. त्यांनी नमूद केले की, पूर्वी मुंबई मध्ये मर्यादित सुविधा उपलब्ध होत्या परंतु आता शासकीय व पोयसर जिमखान्यासारख्या खासगी संस्थांनी खेळाडूंसाठी अनेक संधी निर्माण केल्या आहेत. परिसंवादाच्या कार्यक्रमात माधव कांबळे – सहाय्यक. संचालक, भारतीय क्रीडा प्राधिकरण, एन बी मोटे – माजी उप. क्रीडा व युवक सेवा संचालक, महाराष्ट्राचा शासन, जया शेट्टी – कबड्डी खेळाडू, कु. श्वेता अवध – तलवारबाजी खेळाडू, मनाली प्रभू व करुणाकर शेट्टी ह्यानी पालक म्हणून प्रतिनिधित्व केले. ह्या परिसंवादाचे यशस्वी संचालन पौलमी कुंडू व सुनील वालावलकर यांनी केले.
कबड्डी, जिम्नॅस्टिक्स, मल्लखांब, कराटे, बॉक्सिंग आणि क्रिकेट अशा विविध क्रीडा संघटनांचे असंख्य पदाधिकारी ह्या चर्चासत्र आणि परिसंवादाला उपस्थित होते. या अधिकाऱ्यांची उपस्थिती मुंबईतील क्रीडापटूंच्या विकासासाठी व्यापक स्वारस्य आणि समर्थन अधोरेखित करते.

चर्चासत्र आणि परिसंवाद हे मुंबईतील खेळाडूंच्या वाढीवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, चांगल्या पायाभूत सुविधा आणि संधींच्या गरजेवर भर देण्यासाठी एक मौल्यवान व्यासपीठ ठरले. खेलो मुंबई गेम्सचा शुभारंभ हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

 

हा अभूतपूर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष आणि मोलाचे परिश्रम केल्याबद्दल सर्वस्वी मुकेश भंडारी, करुणाकर शेट्टी, हर्षद मेहता, संजय शहा व मनन पारेख यांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *