कोल्हापूर : आज आपल्या देशामध्ये अनेक सहकारी संस्था आहेत. युवा पिढीने यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्यायला हवा. सहकारी संस्था बळकट करण गरजेचं असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपुदी मुर्मू यांनी केले. राष्ट्रपती द्रौपुदी मुर्मू आज कोल्हापूर दौऱ्यावर होत्या. वारणानगरमधील उद्योग समूहाच्या विविध कार्यक्रमांना द्रौपुदी मुर्मू यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी वारणा समूहाचे कौतुक केले.

राष्ट्रपती द्रौपुदी मुर्मू  म्हणाले की, वारणा समूहाच्या सोहळ्याला येण्याचा आनंद आहेलिज्जत पापड सारखे घराघरात जाणारे ब्रँडचे प्रॉडक्ट इथं बनवले जातात. दुग्ध उत्पादनात वारणा समूह पुढे आहे. राष्ट्रपती म्हणाल्या की, वारणामधील महिला समूहाचा सोहळा पार पडत आहे. महिलांना सामाजिक स्थान वाढवण गरजेचं असून सरकार यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक संस्था देखील महिलांसाठी कार्यरत आहेत. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. महिलांची प्रगती ही देशाच्या उन्नती आणि विकासामध्ये महत्वाची अहे. त्यामुळे महिलांच्या दैनंदिन जीवनात बदल होत आहे. आपल्यासोबत सर्व महिलांना या प्रगतीपथावर आणणे गरजेचं आहे असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज करवीर निवासिनी श्रीअंबाबाई देवीला कुंकुमार्चन अभिषेक करुन विधिवत पूजा केली. एकारती, पंचारती व कर्पुरआरती करुन देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्या इतिश्री मुर्मू व भाऊ तारिणीसेन टुडू यांनीही देवीचे दर्शन घेतले.

 यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, सहाय्यक आयुक्त समीर मुजावर, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ.संपत खिलारी आदी उपस्थित होते.

सुरुवातीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. दर्शनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून श्री अंबाबाई देवीच्या मंदिराविषयी माहिती जाणून घेतली तसेच मंदिरातील दगडी झुंबर व शिल्पकलेची पाहणी केली. देवीच्या किरणोत्सवाची माहिती जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी त्यांना दिली. देवीचे दर्शन झाल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाधान व्यक्त केले.

श्री अंबाबाई मंदिराच्या इतिहासात प्रथमच भारताच्या राष्ट्रपती यांनी श्री अंबाबाई मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतल्याची माहिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *