१०० हून अधिक लहानग्यांनी गिरवले पर्यावरण रक्षणाचे धडे – परिषा सरनाईक
अनिल ठाणेकर

 

ठाणे : विहंग चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्षा, माजी नगरसेविका परिअधिषा प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे शिवाईनगर येथे ६ वर्षावरील बालमित्रांसाठी गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाला उत्स्फुर्तपणे हजेरी लावली. या प्रशिक्षण कार्यशाळेला विद्यार्थ्यांची लगबग व प्रचंड उत्साह होता.
गणपती बनविण्याच्या कार्यशाळेत प्रशिक्षक दत्तात्रय चिव्हाने यांनी विद्यार्थ्यांना गणपती कसे बनविले जातात, याबद्दल प्रशिक्षण दिले. इतर प्रकारची माती व शाडूची माती यामधील फरक समजावून सांगितला. पीओपी पासून बनविल्यालेल्या मूर्तिमुळे पर्यावरणाचे प्रदूषण होते. यासारख्या विषयांवर विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती समजावून सांगितली. यामुळे शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवणं का चांगलं आहे हे देखील सांगण्यात आलं. विद्यार्थ्यांना शाडू माती पासून गणपती तयार करण्यास शिकवले व योग्य असे मार्गदर्शन केले. शाडू मातीचा वापर केल्याने पाण्याचे होणारे प्रदूषण व गणपतीच्या मूर्तीची होणारी विटंबना आपण टाळू शकतो. हा संदेश या कार्यशाळेतून विद्यार्थ्याना देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने शाडू माती पासून सुंदर अशा गणपतीच्या मूर्ती तयार केल्या याने विद्यार्थ्यांना सणांचे महत्व देखिल समजते. मातीच्या गणपतीचे निसर्ग संवर्धनासाठी महत्व त्यांना सांगतिले. प्रशिक्षकांनी गणपतीची मुर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक लहानग्या सवंगड्यांना दाखवले. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून सुद्धा हेच प्रात्यक्षिक करून घेतले. कार्यशाळेमध्ये १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून मातीपासून गणपतीच्या मुर्ती बनविल्या. कार्यशाळेच्या अंतिम टप्यात सर्वांनी निसर्ग संवर्धनात जास्तीत जास्त हातभार लावण्याची गरजेचे आहे, असे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी माजी नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक यांच्या तर्फे विभागात विविध उपक्रम राबविण्यात येतात. या प्रशिक्षणात शिवाईनगर येथील मुलांनी चांगला प्रतिसाद दिला. या मुलांना प्रशिक्षण कार्यशाळा पूर्ण केल्या बद्दल प्रशस्तिपत्रक देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. बुद्धीचा दैवत असलेल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं म्हणजे विघ्नहर्त्या गणरायाच्या पुजेचं महत्व मुलांना आपली संस्कृती व त्याचे महत्व समजावे. धार्मिक गोष्टी लहानपणापासून लक्षात याव्या यासाठी असे उपक्रम आम्ही नेहमीच राबवित असतो असं परिषा सरनाईक यांनी ह्यावेळी सांगितले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सहभागी विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले यांचे देखील आभार ह्यावेळी परिषा सरनाईक यांनी मानले.
००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *