अनिल ठाणेकर
ठाणे : विधान परिषद व विधानसभा सदस्यांच्या उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषण पुरस्कार वितरण सोहळ्यात, आमदार प्रताप सरनाईक यांना विधिमंडळातील सन २०२०-२०२१ या वर्षासाठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार देऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त भारताच्या राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे शुभहस्ते विधान परिषद व विधानसभा सदस्यांना उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषण पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला यात मंगळवारी आमदार प्रताप सरनाईक यांना विधिमंडळातील सन २०२०-२०२१ या वर्षासाठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार देऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर , विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे तसेच विधिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
००००००००
