राजेंद्र साळसकर
मुंबई : हेराल्ड ग्लोबल आणि ईआरटीसी मीडिया द्वारे “प्राइड ऑफ इंडिया – आयकॉन २०२४” हा पुरस्कार भारताच्या अभिमानाला मूर्त रूप देणाऱ्या प्रतिष्ठित नेत्यांचा सन्मान करण्यासाठी देण्यात येतो. देशास अभिमानास्पद कामगिरी, कर्तव्याप्रति वचनबद्धता, दूरदर्शी नेतृत्व, महत्त्वपूर्ण योगदान, भारताच्या समृद्ध वारसाचे प्रतिबिंब आणि अर्थव्यवस्थेवरील परिवर्तनात्मक प्रभाव अशा विविध बाबींची दखल घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार अरविंद सावंत यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आयटीसी मराठा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘गोलफेस्ट कॉन्क्लेव्ह २०२४’ या भव्य सोहळ्यामध्ये खासदार अरविंद सावंत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदर सोहळ्यास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर अध्यक्ष श्री. ललित गांधी, बॉम्बे बार असोसिएशन अध्यक्ष श्री. नितीन ठक्कर यांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी चित्रपट , उद्योग ,संगीत क्षेत्रातील यशस्वी,प्रतिभावंतांचा सत्कार करण्यात आला .हेराल्ड ग्लोबल चे मुख्य संपादक सैमिक सेन यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .यावेळी ईआरटीसी मीडियाचे प्रतिनिधी, समाजातील विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावणारे गुणवंत उपस्थित होते.
हेराल्ड ग्लोबल संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतास थायलंड, दुबई, मलेशिया, सिंगापूर, लंडन आदी देशांत अनेक यशस्वी कार्यक्रम यापूर्वी केले आहेत. आज संपन्न झालेल्या सोहळ्यात भारतातील यशस्वी ब्रँड्स आणि विविध क्षेत्रातील यशस्वी नेत्यांची ओळख करून देणार्या कॉफी टेबल बुकच्या 16 व्या आवृत्तीचे प्रकाशन देखील याप्रसंगी करण्यात आले.
०००००
